30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeव्हिडीओSudha Murti : संभाजी भिडे आणि सुधा मूर्तींची भेट वादाच्या भोवऱ्यात

Sudha Murti : संभाजी भिडे आणि सुधा मूर्तींची भेट वादाच्या भोवऱ्यात

सुधा मूर्ती यांची संभाजी भिडे यांच्यासोबत झालेली भेट आणि त्यांनी त्यांच्या पाया पडणं यामुळे सुधा मूर्ती यांच्यावर सोशल मिडीयावर टीका करण्यात येत आहे.

सांगली येथे एका कार्यक्रमादरम्यान इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murti) यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची भेट घेतली. सुधा मूर्ती या आपल्या लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. सुद्धा मूर्ती यांचे मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषेतील साहित्य हे सर्वाधिक वाचले जाणारे साहित्य आहे. दरम्यान, सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडे यांची भेट घेताच त्या त्यांच्या पाया पडल्या. सुधा मूर्ती यांची कोणाच्या पाया पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सुधा मूर्ती एका महिलेच्या पाया पडल्या होत्या. पण यावेळी टिकलीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले संभाजी भिडे यांच्या पाया पडतानाचा सुधा मूर्तींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांची भेट झाल्यानंतर दोघेही 4 ते 5 मिनिटे चर्चा करत बसले होते.

काही दिवसांपूर्वी एका माध्यमातील महिला प्रतिनिधीला संभाजी भिडे यांनी ‘आधी टिकली लाव, मग बोलेल’ असे म्हंटले होते. त्यानंतर संभाजी भिडे यांच्यावर टीकेची झोड उठली. हा वाद ताजा असतानाच सुधा मूर्ती यांची संभाजी भिडे यांच्यासोबत झालेली भेट आणि त्यांनी त्यांच्या पाया पडणं यामुळे सुधा मूर्ती यांच्यावर सोशल मिडीयावर टीका करण्यात येत आहे.

टिकलीच्या वादावरून संभाजी भिडे यांच्यावर सोशल मीडियावर अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. काहींनी संभाजी भिडे जे काही म्हणाले त्याला पाठिंबा सुद्धा दिला, तर काही लोकांनी संभाजी भिडे हे कायमच असे वादग्रस्त वक्तव्य करत असतात असे म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी