27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरव्हिडीओVIDEO : वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा : नितेश राणे

VIDEO : वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा : नितेश राणे

संजय राऊत याचा वरचा भाग सटकलेला असून त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात ठेवा. त्यांची थर्टी फस्टची पार्टी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हायला हवी" असंही नितेश राणे म्हणाले.

मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून शिंदे आणि ठाकरे गटांत जुंपली असून शिंदे गटाने हे कार्यालय ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी जे जे बाळासाहेबांचं आहे, ते ते एकनाथ शिंदेंचं आहे वाटीभर पक्षाला कार्यालय कशाला असे म्हणत वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा! असं म्हणत उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

तर संजय राउतांवर देखील टीकेची झोड उठवत संजय राऊत याचा वरचा भाग सटकलेला असून त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात ठेवा. त्यांची थर्टी फस्टची पार्टी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हायला हवी” असंही नितेश राणे म्हणाले.
बाळासाहेब ज्या ज्या ठिकाणी बसायचे तिथं एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहिलेले जे कुणी महापालिकेतील कार्यालयात गेले असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही नितेश राणेंनी केली आहे.

हे सुद्धा पहा : 

VIDEO : नितेश राणे यांची खुल्लमखुल्ला धमकी; आमची माणसे निवडून द्या, नाहीतर निधी विसरा !

Sanjay Raut :संजय राऊतांच्या डायरीत पैशांच्या गंभीर नोंदी, एकनाथ शिंदेंसोबतही व्यवहार

Video : गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर पुन्हा जहरी टीका, ‘बिनबुडाच्या विचारसरणीचे चाणक्य’ अशी केली संभावना

VIDEO : राज ठाकरेंनी अमित शाहांचे कुत्सितपणे केले अभिनंदन !

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी