29 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरव्हिडीओVIDEO : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात शुभमन गिलचा डबल धमाका

VIDEO : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात शुभमन गिलचा डबल धमाका

भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने पुन्हा एकदा शानदार शतक झळकावले आहे. पण गिलशिवाय इतर कोणतेही भारताचे फलंदाज मोठी खेळी साकारू शकले नाहीत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना आज खेळवला जात आहे. वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने पुन्हा एकदा शानदार शतक झळकावले आहे. पण गिलशिवाय इतर कोणतेही भारताचे फलंदाज मोठी खेळी साकारू शकले नाहीत.

प्रथम फलंदाजी करत भारताने न्यूझीलंडच्या संघाला ३५० धावांचे आव्हान दिले आहे. यामध्ये भारताच्या शुभमन गिलने २०८ धावांची शानदार खेळी साकारली आणि शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. इतकेच नव्हे तर गिलचे हे वनडेमधील सलग दुसरे शतक आहे. लंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ११४ धावा केल्या होत्या. शुभमन गिलने या पहिल्या वनडे संयत ऐटीत आपले पहिले द्विशतक झळकावले आहे. त्याने १४५ चेंडूत शानदार द्विशतक झळकावले आहे. त्याने या त्याच्या इनिंगमध्ये १९ चौकार आणि ८ षटकार लगावले आहेत. त्याने ४९ व्या षटकातील ३ चेंडूत ३ षटकार लगावत आपले द्विशतक पूर्ण केले.

हे सुद्धा पहा: Cricket News : बाबो! वनडे सामन्यांत 277 धावा; धोनीच्या शिलेदारानं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम 

 जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट; भारत-श्रीलंका वनडेआधीच भारतीय संघात कोणते बदल?

Rishabh Pant Urvashi Rautela : पंत-उर्वशीच्या नात्याबाबत शुभमन गिलने केला मोठा खुलासा! म्हणाला,’त्याला फरक पडत नाही…’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी