22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरव्हिडीओSushma Andhare : सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

राज्याच्या राजकारणात सध्या अनेकजण एकमेकांवर टीका करतंच असतात. पण सध्या शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यातील वाद वाढला आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या अनेकजण एकमेकांवर टीका करतंच असतात. पण सध्या शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यातील वाद वाढला आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा नटी म्हणून उल्लेख केला. ‘ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं.’ असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत केले होते.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याला उत्तर देत सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी ‘गुलाबराव पाटील ज्या पातळीवर उतरले त्यावर मी उतरू शकत नाही. तुम्ही अश्लाघ्य आणि सवंग टिप्पणी करून माझ्या बाईपणावर हल्ला करण्याचा आणि मला नामोहरम करण्याचा जो बालीश प्रयत्न करत आहात, त्यावरून मला तुमची कीव करावीशी वाटते, तुमची भाषा तुमचा माज दाखवणारी आहे. परंतू मी बाईपणाचं कोणतंही व्हिक्टीम कार्ड खेळणार नाही. तुमचा सरंजामी माज संविधानिक पद्धतीने उतरवून दाखवेन,’ असा घणाघात केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!