26 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरव्हिडीओAnandacha Shidha : आनंदाच्या शिधाचा आनंद गरिबांना मिळालेला नाही : मनिषा कायंदे

Anandacha Shidha : आनंदाच्या शिधाचा आनंद गरिबांना मिळालेला नाही : मनिषा कायंदे

आनंदाचा शिधा दिवाळी उलटून जात असली तरी अद्यापही पात्र धारकांना मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या, आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारकडून यंदाच्या वर्षीची सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याची घोषणा केली. परंतु हा आनंदाचा शिधा दिवाळी उलटून जात असली तरी अद्यापही पात्र धारकांना मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या, आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे. दिवाळीत मिळणार आनंदाचा शिधा नवीन वर्षामध्ये मिळणार का ? असा प्रश्न आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच नाव जरी आनंदाचा शिधा असले तरी हा आनंद अजून गरिबांच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही असेही यावेळी मनीषा कायंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आनंदाचा शिधा यावरून मनीषा कायंदे यांनी राज्य शासनाची चांगलीच कान उघडणी देखील केलेली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी आनंदाचा शिधा हा तुळशीच्या लग्नापर्यंत जनतेला मिळेल असे म्हंटले आहे. यावर उत्तर देताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, पुढे हे नवीन वर्षापर्यंत आनंदाचा शिधा लोकांना मिळेल असे बोलायला देखील कमी करणार नाही.

हे सुद्धा वाचा

Anandacha Shidha : सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा पडतोय महागात

Anandacha Shidha : दिवाळीतील आनंदाचा शिधा आता ऑफलाईन मिळणार

Eknath Shinde : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

आनंदाचा शिधा लोकांना देणे हे केवळ २०२४ ची तयारी शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत असल्याचे देखील यावेळी मनीषा कायंदे यांच्याकडून सांगण्यात आले. लोकांच्या मनातून तुम्ही उतरले आहात. लोकांच्या जीवनात तुम्ही आनंदाचे क्षण आणू शकता का ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तसेच ज्या बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ते स्वतःला बोलवून घेत आहेत किंवा ज्या आनंद दिघे यांच्या नावावरून ते आनंदाचा शिधा वाटप करत आहेत, त्यांचाच या शिधाच्या पाकिटावर फोटो नसल्याने हे सर्व दिल्लीतील नेत्यांना खुश करण्यासाठी करत आहात का ? अशी टीका देखील मनीषा कायंदे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!