लय भारी चे संपादक तुषार खरात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निढळ या गावी नुकताच दौरा केला. निढळ गावात त्यांना एक शेतकरी भेटले. ते एक उच्चशिक्षित शेतकरी होते. ते उच्च शिक्षण घेऊन सुद्धा ते बेरोजगार आहेत. नोकरी करायची इच्छा असून त्यांना नोकरी मिळत नाही नाईलाजाने त्यांना शेती करावी लागत आहे.
Vidhansabha Election| पाणी आणण्यामध्ये ३६ आमदारांचे योगदान मोठे | एका आमदाराने श्रेय घेवू नये
सरकारकडून पण त्यांना काही सवलती भेटत नाहीत. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच विकास केला असा दर्प जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत असतात. जयकुमार गोरे यांच्या तथाकथित विकासासंबंधी सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माण – खटाव मतदारसंघातील येळेवाडी या गावात लय भारीचे संपादक पोचले.