30 C
Mumbai
Wednesday, March 22, 2023
घरव्हिडीओVIDEO : वाहतूक पोलिस उकळलत आहेत पैसे

VIDEO : वाहतूक पोलिस उकळलत आहेत पैसे

वाहतूक पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथे एक वाहतूक पोलीस अधिकारी चक्क एका रिक्षा चालकाकडे पैशाची मागणी करताना दिसत आहे .सदर व्हीडिओ हा कल्याण मधील असल्याचे बोलले जात आहे. कल्याणच्या कोळसेवाडी वाहतूक पोलीस चौकीचे निरीक्षक नवनाथ मिरवणे असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात एका रिक्षा चालकाकडून वाहतूक नियमांचा उल्लंघन झाल्यानंतर त्याच्याकडून रीतसर कायदेशीर पावती फाडण्याऐवजी मिरवणे हे रिक्षा चालकाकडे पैशाची मागणी करत दिसून येत आहे .हा रिक्षा चालक शंभर रुपये देत असताना आणखी शंभर रुपये वाढवून देण्याची मागणी वाहतूक पोलीस मिरवणे करत होते.मोबाईल मध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला असुन तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी