28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeव्हिडीओजाणून घ्या अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

खान्देशात "आखाजी" म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. अहिराणी भाषेतील "आखाजी"ची सुमधूर गाणी गात माहेरवाशीनी गौरी शंकराला पुजतात. अगदी महाभारतातही ज्याच महत्व सांगितलय असा हा 'अक्षय्य' सण.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व मराठी संस्कृतीत खूपच आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेळ्या पद्धतीने साजरा होणारा हा सण. खान्देशात “आखाजी” म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. अहिराणी भाषेतील “आखाजी”ची सुमधुर गाणी गात माहेरवाशिनी गौरी-शंकराला पुजतात. विदर्भातही अक्षय्य तृतीयेचे खासच महत्त्व असते.

अक्षय्य तृतीया म्हटले, की दोन गोष्टी आवर्जून आठवतात. धातूंचा राजा सोने आणि फळांचा राजा ‘आंबा’. या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्याची जुनी प्रथा आहे. आंबा खायला सुरुवात करायची असते, ती याच दिवशी. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न गाठ बांधली तर नाते अक्षय्य राहते, असे मानून अनेकजण याच दिवशी संसाराला सुरुवात करतात. अगदी महाभारतातही ज्याचे महत्व सांगितले आहे, असा हा ‘अक्षय्य’ सण.

 

हे सुद्धा वागा : 

सुवर्णसंधी: अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने झाले स्वस्त; जाणून घ्या नवे दर

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं !

अक्षय्य तृतीयेच्या आधी अशुभ गोष्टी घरातून काढून टाका; समृद्धी वाढेल

‘लय भारी’च्या टीमकडून तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या खूप-खूप शुभेच्छा.

Akshay Tritiya, Akhaji in Khandesh, Marathi Festival, Gold Mango, GauriShankar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी