27 C
Mumbai
Tuesday, August 22, 2023
घरव्हिडीओकर्नाटक निवडणूक प्रचार : देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा

कर्नाटक निवडणूक प्रचार : देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा

सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. सीमा भागातील कानडी दडपशाहीविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: किंवा सरकार म्हणूनही शिंदे-फडणवीस यांनी काही भूमिका घेतली नाही. मात्र, आता फडणवीस कानडी अस्मिता गोंजारत कन्नड भाषेतून भाषणे देत फिरताना दिसत आहेत.

कर्नाटक निवडणूक प्रचार सध्या जोरात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटक निवडणूक प्रचारात स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा या प्रचारादरम्यान दिसत आहे. या प्रचारातील फडणवीस यांच्या कन्नड भाषेतील भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. बोम्मई यांच्या नेतृत्त्वातील कर्नाटकातील भाजप सरकार सीमाभागात दडपशाही करत आहे. कर्नाटकातील भाजप सरकारविरोधात महाराष्ट्रात, सीमा भागातील मराठी बांधवात तीव्र संतापाची भावना आहे. या कानडी दडपशाहीविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: किंवा सरकार म्हणूनही शिंदे-फडणवीस यांनी काही भूमिका घेतली नाही. मात्र, आता फडणवीस कानडी अस्मिता गोंजारत कन्नड भाषेतून भाषणे देत फिरताना दिसत आहेत.

 

कर्नाटकातील विजयपुरा क्षेत्रातील बाबळेश्वर येथील हा व्हिडिओ आहे. येथून भाजपचे गौडा पाटील हे उमेदवार आहेत. फडणीस यांच्यासह सांगली जिल्ह्यातीलही अनेक भाजप कार्यकर्ते कर्नाटक विधानसभा प्रचारात सामील झाले होते.

हे सुद्धा वाचा :

फडतूस फडणवीस !

शिंदे-फडणवीसांची सावरकर गौरवयात्रा म्हणजे अदानी बचाओ यात्रा राऊतांचा निशाणा

बोम्मई यांच्या ट्विटबाबत अमित शहांना पत्र लिहिणार फडणवीस

Devendra Fadanvis Kanadi Bana, Fadanvis Kannad Bhashan, Fadanvis Karnatak Election, Fadanvis Karnatak

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी