28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeव्हिडीओखारघरचे बळी : मराठी मीडियाला लोकं शिव्या घालताहेत !

खारघरचे बळी : मराठी मीडियाला लोकं शिव्या घालताहेत !

खारघरचे बळीवरून मराठी मीडियाला लोकं शिव्या घालताहेत. वेळेवर प्यायला पाणी न मिळाल्यानेही लोकांचे जीव गेल्याचे पोस्टमार्टेम अहवालातून उघड झाले आहे. या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेणाऱ्या, गप्प राहिलेल्या मराठी वृत्तवाहिन्यांवर लोकं चिडली आहेत. त्यातून सोशल मीडियावर निषेध_मराठी_पत्रकारितेचा असा ट्रेंड चालविला जात आहे. मराठी वृत्त वाहिन्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

खारघरचे बळी अजूनही राज्याला अस्वस्थ करत आहेत. त्यावरून मराठी मीडियाला लोकं शिव्या घालताहेत. खारघरमध्ये 16 एप्रिल रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र भीषण कार्यक्रमात अव्यवस्था, नियोजनातील गोंधळ तसेच चेंगराचेंगरी आणि उष्माघाताने 13 हून अधिक बळी गेले आहेत. बळींची ही संख्या प्रत्यक्षात अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेवर प्यायला पाणी न मिळाल्यानेही लोकांचे जीव गेल्याचे पोस्टमार्टेम अहवालातून उघड झाले आहे.

खारघर दुर्घटनेवरून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहेच. मात्र, या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेणाऱ्या, गप्प राहिलेल्या मराठी वृत्तवाहिन्यांवरही लोकं चिडली आहेत. त्यातून सोशल मीडियावर निषेध_मराठी_पत्रकारितेचा असा ट्रेंड चालविला जात आहे. मराठी वृत्त वाहिन्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

 

जयेश कवडे या युझरने ट्विटरवर म्हटले आहे –
समस्त मराठी पत्रकारितेला आज भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
आजवर सत्यापाई ज्या ज्या पत्रकारांनी मरण पक्तरले त्यांचा आत्मा तळमळला असेल.
#निषेध__मराठी_पत्रकारांचा

रुमानी भाऊंची ताई या युझरने म्हटले आहे –
विरुद्ध पार्टी नेते त्यांची भूमिका मांडत आहेत.
पत्रकार तुम्ही कधी बोलणार?
तुम्हाला खास निमंत्रणाची गरज आहे का?🙄☹️
अजून कोणीही झालेल्या चेंगारा चेंगरी बद्दल, मृतांच्या खऱ्या अकडायांबद्दल बोलत नाही. खोके मिळालेत का?
#निषेध_मराठी_पत्रकारांचा

खारघर हत्याकांडप्रकरणी माध्यमांच्या भूमिकेवर सोशल मीडियात संताप
खारघर हत्याकांडप्रकरणी माध्यमांच्या भूमिकेवर सोशल मीडियात संताप

मराठी वृत्तवाहिन्या सरकारच्या रखेल आहेत का? असा संतप्त सवाल धनूभाऊ या युझरने केला आहे.

गजाभाऊ (@gajanangaikwad) या युझरने म्हटले आहे –
मेलेले साधकच्या पोटात अन्न किंवा पाणी नव्हते असे पोस्टमार्टेम सांगतो आणि हे बघा कसे हादडत आहेत
आप्पा sorry (स्वारी) पण खात आहेत. कुणी यावर प्रश्न विचारेल का ?
#निषेध_मराठी_पत्रकारांचा

खारघर दुर्घटना विरोधी पक्ष नेते अजित पवार प्रतिक्रिया
खारघर दुर्घटना : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया (फोटो क्रेडिट : सामना / गुगल)

एक संतप्त प्रतिक्रिया अशी –
अयोध्येत सुसू, शीशी आणि दात घासताना फक्त दाखवल न्हवत. किती खोके दिलेले exclusive coverage साठी? कुठे फेडणार?
मिडिया भिकारचोट आहे.
खारघर दुर्घटना.😭 माणसं तिथे गेलीत, जखमी झालीत पण शून्य कव्हरेज after the event.
#निषेध_मराठी_पत्रकारांचा

चिन्मय कुलकर्णी या अप्पा धर्माधिकारी भक्ताची प्रतिक्रिया
चिन्मय कुलकर्णी या अप्पा धर्माधिकारी भक्ताची प्रतिक्रिया

बाबा बिनधास्त या युझरने म्हटले आहे –
पालघर साधू हत्तेमध्ये थयथयाट करणाऱ्यां दलाल पत्रकारांनो खारघरमधील मृत हिंदू नाहीत का?
कोणाच्या दबावाखाली या हत्याकांड ची बातमी दाबत आहात ???
#people_against_corroupt_media #निषेध_मराठी_पत्रकारांचा
#खारघर_हत्याकांड

हे सुद्धा वाचा / पाहा : 

शिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे !

देवेंद्र फडणवीस आता कुणावर 302चा गुन्हा दाखल करणार ?

महाराष्ट्र भूषण: डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या गौरव सोहळ्यात रणरणत्या उन्हात लाखोंचा जनसागर लोटला


श्री वीर सुंदर या युझरने म्हटले आहे –
खारघर हत्याकांड असो की राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस असो ह्या महत्वाच्या प्रश्नावर सरकार ला जाब नं विचारणाऱ्या मराठी पत्रकारांचा धिक्कार असो.
#निषेध__मराठी_पत्रकारांचा

आणि म्हणोन या युझरने म्हटले आहे –
50 हजाराची पाकिटं घेऊन सरकारची दलाली करणार असाल आणि सरकारची तळी उचलणार असाल तर पत्रकार म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही. राजीनामा द्या आणि सरळ प्रवक्ते होऊन उचला तळी. पत्रकार असल्याचं सोंग आणू नका. खारघर हत्याकांवर आवाज उठवणार हात की नाही. #निषेध_मराठी_पत्रकारांचा

#निषेध_मराठी_पत्रकारांचा हॅशटॅगवरील प्रतिक्रिया या लिंकवर क्लिक करून वाचता येऊ शकतील. 

Anger against Marathi News Channels, Marathi News Channels, Maharashtra Bhishan, Social Media, Kharghar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी