29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओमराठा आरक्षण : शिंदे सरकारची परीक्षा

मराठा आरक्षण : शिंदे सरकारची परीक्षा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता दुरुस्ती याचिका म्हणजे क्युरेटिंग पीटीशन सादर केली जाणार आहे. मराठा संघटनांचा चंद्रकांत पाटील यांना विरोध आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरही मराठा समाजाचा विश्वास उरलेला नाही. फडणवीस यांचे खासमखास असलेले गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनीच मराठा आरक्षणात खोडा घातल्याची मराठा समाजात भावना झाली आहे. सदावर्ते यांचे बोलविते धनी कोण, हाही प्रश्न त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तानाजी सावंत यांच्यासारख्या बेताल मंत्र्याला आवर घालावा लागणार आहे.

मराठा आरक्षण हा विषय आता शिंदे सरकारची परीक्षा पाहणारा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आता पुन्हा दुरुस्ती याचिका म्हणजे क्युरेटिंग पीटीशन सादर करणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कठीबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज सरकारची महत्वाची बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही करावे  लागेल, ते आम्ही करू; ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या आम्ही भरून काढू, असे शिंदेंनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता दुरुस्ती याचिका म्हणजे क्युरेटिंग पीटीशन सादर केली जाणार आहे. मराठा संघटनांचा चंद्रकांत पाटील यांना विरोध आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरही मराठा समाजाचा विश्वास उरलेला नाही. फडणवीस यांचे खासमखास असलेले गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनीच मराठा आरक्षणात खोडा घातल्याची मराठा समाजात भावना झाली आहे. सदावर्ते यांचे बोलविते धनी कोण, हाही प्रश्न त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तानाजी सावंत यांच्यासारख्या बेताल मंत्र्याला आवर घालावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा :

मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात; महाराष्ट्र सरकार क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

EWS Quota SC Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; EWS आरक्षणचा निर्णय कायम राहणार

मराठा आरक्षण प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका!

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आता दर मंगळवारी मराठा उपसमितीची बैठक घेणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कठीबद्ध असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी 50% आरक्षण देत असताना त्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश केला होता. मात्र, आता मराठा समाजाला आरक्षणातून वगळले आहे. आज मराठा समाज सामाजिक मागास आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मराठा संघटनांनी शिंदे सरकार आणि भाजपला ठणकावून सांगितले आहे.

Maratha Reservation, Shinde Government Exam, Maratha Morcha, EWS, Tanaji Sawant

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी