सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत भाजपचे आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात नितेश राणे यांची खुल्लमखुल्ला धमकी देताना दिसत आहेत. आमची माणसे निवडून द्या, नाहीतर निधी विसरा, असे ते थेट सांगत आहेत.
“डीपीडीसी, ग्रामविकास, 25:15 अथवा केंद्र सरकारचा निधी असो, हा निधी कोणाला द्यायचा, याची सूत्रे माझ्या हातात आहेत. जिल्हा नियोजन, ग्रामविकास, 25:15 निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो, जिल्हाधिकारी, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा.”
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कोपरा सभेतील बोलताना नितेश राणे यांनी गावकऱ्यांसमोर ही थेट धमकीची भाषावापरली आहे. जर माझ्या विचारांचा सरपंच गावात निवडून आला नाही, तर तुमच्या गावाला निधी मिळणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे राणे यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. विरोधक शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सत्तेचा माज आल्यामुळे राणे अशी भाषा वापरत असल्याचे म्हटले आहे. मागे नारायण राणे यांचा माज जनतेने उतरवला होता. आता देखील जनता त्यांचा माज उतरवेल, असा टोला नाईक यांनी लगावला आहे.
हेही वाचा :
अखेर राणेंनी स्वत:च अधीश बंगल्यावर चालवला हातोडा
आमदारांना राज्य कसे चालवावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज, सत्यजीत तांबे यांचे खरमरीत पत्र
Nitesh Rane Threats Villagers, Nitesh Rane Threat VIDEO, Open Threat for Voting