29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeव्हिडीओअजूनही सुपर सीएम फडणवीस सांगे तैसाच सीएम शिंदे बोले!

अजूनही सुपर सीएम फडणवीस सांगे तैसाच सीएम शिंदे बोले!

शिंदे यांनी फडणवीस यांची परवानगी घेऊन त्यांच्या निर्देशानुसारच पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे पुन्हा एकदा "सुपर सीएम"ची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात नवे सरकार येऊन सहा महीने लोटले तरी "अजूनही फडणवीस बोले तैसाच शिंदे बोले" अशीच स्थिती दिसत आहे.

राज्यात नवे सरकार येऊन सहा महीने लोटले तरी “अजूनही फडणवीस सांगे तैसाच शिंदे बोले” अशीच स्थिती आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांच्यासमोरील माईक उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ओढून घेतला होता. त्यावर जबरदस्त टीका झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज पत्रकारपरिषदेत झाली. शिंदे यांनी फडणवीस यांची परवानगी घेऊन त्यांच्या निर्देशानुसारच पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे पुन्हा एकदा “सुपर सीएम”ची चर्चा सुरू झाली आहे.

पत्रकार परिषदेची प्रास्ताविक सुरुवात फडणवीस यांनी केली. नंतर त्यांनी मुख्यमंत्री बोलतील असे जाहीर केले. तेव्हा शिंदे यांच्यासमोरील माईक ऑफ ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी सुरुवात करण्यापूर्वी फडणवीस यांनी मदतनीसाला बोलावून शिंदे यांच्यासमोरील माईक ऑन करायला सांगितला. मदतनीसाने फडणवीस यांच्या बाजूने येऊन शिंदेंसमोरील माईक ऑन केला. त्यावेळी फडणवीस यांना शिंदेंना काहीतरी सूचना करायची होती, निर्देश द्यायचे होते. मागे काही वेळा हे सारे कॅमेऱ्यात तर कैद झाले होतेच; पण आवाजही टिपला गेला होता. हा अनुभव ध्यानात घेऊन आज फडणवीस यांनी काळजी घेतली. माईक ऑफ असेल असे त्यांना वाटले होते. मात्र, टॉवर शिंदेंसमोरील माईक फडणवीसांच्या निर्देशानुसारच सुरू करण्यात आला होता. त्या माईकसह, वृत्तवाहिन्यांच्या माईकनीही सूत्रधार फडणवीस यांचे निर्देश आणि मुख्यमंत्र्यांचा “आज्ञाधारकपणा” टिपलाच!

 

फडणवीस यांनी सूत्रे दिल्यानंतर, एखादा विद्यार्थी जशी शिक्षकांची परवानगी घेतो, तसे शिंदेंनी फडणवीस यांना विचारले, “हे वाचू का?” त्यावर फडणवीस म्हणाले, “नाही, वाचायची गरज नाही.” त्यावर आज्ञाधारकपणे मान डोलावत शिंदे म्हणाले, “हं ठीक आहे.” त्यानंतरही फडणवीस यांना काहीतरी सूचना करायचीच होती. मात्र, त्यांना कॅमेरे आणि माईकचे भान आले असावे कदाचित म्हणून त्यांनी आवरते घेतले आणि एकदाचे मुख्यमंत्री शिंदे “ठरल्यानुसार” बोलू लागले.

यापूर्वी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडून माईक ओढून घेतला होता व चिठ्ठी लिहिली होती. भर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी केलेल्या कृतीवरुन “सुपर सीएम”ची चर्चा झाली होती. तेव्हा फडणवीस यांनी उलट माध्यमांनाच दोषी ठरवत टीका केली होती. माध्यमांकडील बातम्या कमी झाल्याने डेस्कवर बसल्या-बसल्या बातम्या करण्याचा “धंदा” सुरु झाल्याचे फडणवीस म्हणाले होते.

 संबंधित व्हिडिओ फेसबुकवर पाहा

हे सुद्धा वाचा : 

देवेंद्र फडणवीसांचे माईक प्रेम आणि बरेच काही

प्रतिविधानसभेवर भास्कर जाधवांचा आक्षेप; त्यांचे माईक जप्त करा

प्रवीण दरेकरांची मविआ सरकार टीका; हा फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार

त्यावरून अजित पवारांनीही जोरदार टीका केली होती. “ही तर सुरुवात आहे. आताच तुम्ही खेचाखेच, ओढाओढ, चिट्टया-चपाट्या सुरू केल्या तर पुढे काय होणार. मीडियाच्या कॅमेऱ्यांचे बारीक लक्ष असते,” असे पवार म्हणाले होते. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले होते, “मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. मात्र, काही लोकांना ते बघवले जात नाही. कोणत्याही सरकारात सुपर सीएम असे काही कुणी नसते, एकच सीएम असतो, एकच प्रमुख असतो, तोच नेता असतो.” एकनाथ शिंदे हे आम्हा सर्वांचे नेते आहेत. आता तुम्ही विरोधात बसण्याची सवय करून घ्या, असा टोलाही फडणवीस यांनी पवारांना लगावला होता. मात्र, आता पुन्हा मीडियाच्या कॅमेरे व माईकनी फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना निर्देश व सूचना देणारा “सुपर बाणा” टिपल्याने शिंदे-फडणवीस यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. आता फडणवीस पुन्हा मीडियाच्या नावेच बोटे मोडणार का, तेही दिसेलच.

Super CM Fadnavis, CM Shinde, Fadnavis Directs CM, Fadnavis Directs CM Shinde Speaks, CM Eknath Shinde

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी