34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओVideo : करिअरच्या तिसऱ्याच सामन्यात 300 मारणारा करुण नायर गायब का झाला...

Video : करिअरच्या तिसऱ्याच सामन्यात 300 मारणारा करुण नायर गायब का झाला ?

6 डिसेंबर हा एका असा दिवस आहे ज्यादिवशी जन्म झालेल्या खेळाडूंचा एक संघ तायर होऊ शकतो. यादिवशी असे अनेक खेळाडू जन्माला आले आहेत. ज्यांनी क्रिकेट विश्वात नाव कमावले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा यांसारख्या भारतीय नावांचा समावेश आहे. या यादीत एक खास नाव देखील आहे आणि ते म्हणजे करुण नायर. आता करुण नायर कोण असा प्रश्न पडला असेल ? तर हा तोच खेळाडू आहे ज्याने अल्पावधीतच नाव कमावले. करुण नायरला भविष्यातील सेहवाग अशी देखील ओळख मिळाली. पण आता मात्र करुण नायर हे नाव दिसेनाशे झाले आहे.

2016 साली इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर होता, सिरीजमधली पाचवी टेस्ट चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवली जात होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी करुण नायर बॅटिंगला आला. करुण नायरच्या करिअरमधली त्याची ही तिसरी टेस्ट मॅच होती. आधीच्या २ सामन्यात त्याने 4 आणि 13 धावा केल्या होत्या. पण या मॅचमध्ये त्याची वेगळीच ऊर्जाशक्ती पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी तो 71 धावा करून नाबाद खेळत होता.चौथा दिवस सुरू झाला त्यावेळी करुण नायर भलत्याच फॉर्मात दिसला आणि बघता बघता त्याने सेंच्यूरी केली. थोटा वेळ गेला मग या पठ्ठ्याची डबल सेंच्यूरी सुद्धा पूर्ण झाली. त्यावेळी करुण नायरने अपेक्षेपेक्षा भारी खेळ केला होता पण गडी काय थांबायचं नावंच घेईना इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी करुण नायर आऊट ऑफ सिलॅबस क्वेश्चन सारखा आला आणि बघता बघता त्याने ट्रिपल सेंच्यूरी सुद्धा पूर्ण केली. त्याच्याआधी भारतासाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 300 रन्स मारणं केवळ सेहवागला जमंल होतं. विशेष म्हणजे ज्या टेस्ट मध्ये त्याने त्रिपट सेंच्यूरी मारली ती करुण नायरच्या करिअरमधली फक्त तिसरी टेस्ट होती. यावेळी त्याने मारलेली सेंच्यूरी त्याच्या इंटरनॅशनल क्रिकेटमधली पहिलीच सेंट्यूरी होती. महत्वाची बाब म्हणजे त्याने ट्रिपल सेंच्युरीमध्ये आख्खे 229 रन्स एकाच दिवसात मारले होते.

त्याच्या या धमाकेदार खेळामुळे स्वतः सेहवाग पासून अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. लोकांमध्ये तर भारताला नवा सेहवाग मिळाल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या. पण यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या मेहनतीला चांगल्या नशीबाची साथ लागते. करुण नायरच्या बाबतीत तेच झालं. एका रात्रीत स्टार बनलेल्या करुणच्या नशीबात काहीतरी वेगळंच लिहीलं होतं. आपल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडसारख्या तगड्या टीमसमोर नॉट आऊट ट्रिपल सेंच्यूरी मारणाऱ्या, 565 मानिटे पिचवर खतरनाक गोलंदाजीचा सामना करणं आणि छोट्याशा करिअरमध्ये विरेंद्र सेहवागची रिप्लेसमेंट म्हणून पुढं येणं अशा अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या करुण नायरने आपल्या आख्ख्या करिअर मध्ये टेस्ट मॅच खेळल्या फक्त 6 वनडे 2 आणि टी20 तर एक पण नाही. त्याने केलेल्या विक्रमानंतर भारतीय संघात उपकर्णधार असणाऱ्या रहाणेनं पुनरागमन केलं आणि करुण नायरचं करिअर थांबलं ते कायमचंच.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी