32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरव्हिडीओVideo : महिला नेत्यांनी संयम राखला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार राही भिडे

Video : महिला नेत्यांनी संयम राखला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार राही भिडे

राज्याच्या राजकारणाची समीकरणे दिवसेंदिवस बदलत असतानाच पुरुष नेत्यांप्रमाणेच महिला नेत्या देखील वादग्रस्त वक्तव्य करू लागल्या आहेत. ज्यामुळे महिला नेत्यांच्या विधानांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्याच्या राजकारणाची समीकरणे दिवसेंदिवस बदलत असतानाच पुरुष नेत्यांप्रमाणेच महिला नेत्या देखील वादग्रस्त वक्तव्य करू लागल्या आहेत. ज्यामुळे महिला नेत्यांच्या विधानांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याच्या राजकारणात बॅक फुटवर राहणाऱ्या महिला नेत्या आता पुढे येऊ लागल्या आहेत. पण या महिला नेत्यांमुळे अनेक वाद होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. नुकतेच भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि सध्या शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या दीपाली सय्यद यांच्यामुळे वाद निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांनी पत्रकारांना सुपारीबाज म्हंटल्याने आणि दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने या महिला नेत्यांविरोधात नाराजी दर्शविण्यात येत आहे.

दीपाली सय्यद या लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार आहेत. पण अद्यापही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना त्यांच्या गटात प्रवेश करून घेण्यासाठी वेळ देण्यात आलेली नाही. ज्यामुळे दीपाली सय्यद या शिंदे गटात जाण्याआधीच नाराज झालेल्या आहेत. परंतु त्यांनी ठाकरे गटातील महिला नेत्या नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे यांचा उल्लेख चिल्लर म्हणून केला तर याचवेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांना बीएमसीमधून खोके येणे बंद झाल्याने त्यांना खंत होत असल्याचे म्हंटले ज्यामुळे दीपाली सय्यद यांच्यावर आता टीका करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे यवतमाळ येथील दौऱ्यावर असताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. पण शिंदे गटातली आमदार संजय राठोड यांचा एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर यामुळे रागावलेल्या चित्रा वाघ यांनी त्या पत्रकाराला ‘सुपारीबाज’ असे म्हंटले. ज्यामुळे चित्रा वाघ यांच्यावर देखील टीका करण्यात येत आहे. तर रागाच्या भरात महिला नेत्यांचा स्वतःवरील संयम सुटत असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!