28 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरव्हिडीओVIDEO : पुण्याच्या संदीप हॉटेलमधील मटणात अळ्या!

VIDEO : पुण्याच्या संदीप हॉटेलमधील मटणात अळ्या!

पुण्यातील सुप्रसिद्ध नॉनव्हेज हॉटेल असलेल्या संदीप हॉटेलमध्ये मटणात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. सोशल मीडियातून ही बाब पुढे आली आहे. एका तरुणाने मागविलेल्या अळणी मटण-भात या डिशमध्ये अळी निघाली.

पुण्यातील सुप्रसिद्ध नॉनव्हेज हॉटेल असलेल्या संदीप हॉटेलमध्ये मटणात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. सोशल मीडियातून ही बाब पुढे आली आहे. (Worms found in Punes Sandip Hotels Mutton) एका तरुणाने मागविलेल्या अळणी मटण-भात या डिशमध्ये अळी निघाली. त्यासंदर्भात हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता अरेरावीची भाषा केली गेली, अशी तक्रार आहे.

पुण्यातील बालगंधर्व चौकात, जंगली महाराज रोड व घोले रोड जंक्शनवर संदीप हॉटेल आहे. मूळचे नगरचे असलेल्या या हॉटेलचे उकड मटण, अळणी मटण, काळ्या मसाल्याचा रस्सा, कंदुरी मटण अशा डिशेस प्रसिद्ध आहेत. ग्राहक रांगा लावून येथे जेवायला येतात. हॉटेलमध्ये जेवणाचे दर जास्त असल्याच्या तक्रारीही नेहमीच होतात. मात्र, आम्ही दर्जा राखतो म्हणून दर वाजवी असल्याचा हॉटेल व्यवस्थापनाचा दावा असतो. या नव्या घटनेने मात्र हॉटेल वादात सापडले आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Worms found in Punes Sandip Hotels Mutton, Sandeep Hotel Pune, Mutton Hotel Pune

हे सुद्धा वाचा : 

हॉटेल ललित मै छुपे है कई राज मिलते है रविवार को : नवाब मलिक

थंडीच्या दिवसांत फ्रुट ज्यूस पिणे टाळा! त्यासाठी आहेत हे पर्याय

थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आरोग्याला फायदेशीर

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!