27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : रेल्वेखाली जीव द्यायला निघालेल्या तरूणीचे पुन्हा जुळले ‘प्रेम’

VIDEO : रेल्वेखाली जीव द्यायला निघालेल्या तरूणीचे पुन्हा जुळले ‘प्रेम’

दोन दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरला होतोय. समोरून लोकल ट्रेन येत आहे, अन् एक तरूणी त्या पटरीतून ट्रेनच्या दिशेने चालत जात आहे. मोटरमनने प्रसंगावधान दाखवत ट्रेनचा वेग कमी केलाय, अन् दुसऱ्या दिशेने पोलीस शिपाई धावत जावून त्या तरूणीला वाचवतोय. हा व्हिडीओ भायखळा रेल्वे स्थानकाजवळील आहे.

त्या तरूणीचे एका तरूणाबरोबर प्रेम संबंध होते. या संबंधातून संबंधित तरूणी गरोदर राहिली होती. त्यामुळे लग्न करण्यासाठी तिने प्रियकराकडे तगादा लावला होता. प्रियकर मात्र ‘थोडे थांब’ असे सांगून दिवस ढकलत होता. त्या दिवशी सुद्धा भायखळा स्थानकावर दोघांचे याच विषयावरून बिनसले, अन् त्या तरूणीचे थेट आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. पण मोटरमन व पोलीस शिपायाच्या प्रसंगावधानामुळे ती वाचली.

खरेतर, आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून या तरूणीवर गुन्हा दाखल व्हायला पाहीजे होता. रेल्वे मार्गात गेली म्हणून आर्थिक दंड आकारणी व्हायला पाहीजे होती. पण पोलीस व रेल्वे प्रशासनाने कायदा दाखविण्याऐवजी मानवता दाखविली. पोलिसांनी तरूणी व तिच्या प्रियकराची समजूक काढली. दोघांचे मनोमिलन सुद्धा करून दिले. लवकरच हे दोघेजण आता विवाहबंधनात अडकतील, अशी आशा करूयात.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी