34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : 2007 अन् 2011 साली आपण जिंकलो कारण संघात युवराज सिंग...

VIDEO : 2007 अन् 2011 साली आपण जिंकलो कारण संघात युवराज सिंग होता

आता युवराजचं नाव घेतलं तर पहिली गोष्ट आठवते 2007च्या टी20 विश्वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याची…. इंग्लंडचा संघ आधीच वांड त्यात त्यांचा ऍंड्रयू फ्लिंटॉफ म्हणजे माजलेला हत्ती… याच फ्लिंटॉफनं 2002 साली वानखेडे स्टेडियमवर मालिका जिंकल्यानंतर अंगावरचा टीशर्ट हवेत भिरकावलेला आता त्याच्या या क्रियेला आपल्या दादाने लॉर्डसच्या बाल्कनीत नेटवेस्ट जिंकल्यावर त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं हे सुद्धा खरंच तोच फ्लिंटॉफ सामन्या दरम्यान युवराज सिंगला स्लेज करू लागला… अगदी आरामात खेळणाऱ्या युवराजचं पंजाबी रक्त उसळलं.. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे खुन्नस देत मैदानात उभे राहिले… दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि आपल्या धोनी आणि इंग्लंड्चाय काही खेळाडूूंनी अंपायर्सच्या मदतीने वाद शांत केला पण या वादाची प्रतिक्रिया इंग्लंडचा बिचारा बॉलर स्टूअर्ट ब्रॉडला सहन करावी लागली.. युवराजने ब्रॉडला एका ओव्हर मध्ये एक-दोन नाय तर सलग ६ छकडे मारले अन् फ्लिंटॉफचा माज जिरवला…

आता त्याच्या पुढचा किस्सा म्हणजे 2011 सालच्या वर्ल्डकपचा युवराज सिंग भारतासाठी हुकमी एक्का होता… धोनी त्याला 4 नंबरवर बॅटींगला पाठवायचा आणि वेळ पडेल तेव्हा बॉलिंग द्यायचा युवराजपण दोन्ही ठिकाणी गरज पडेल तसं संघाला सावरून घ्यायचा याशिवाय युवराजचा स्ट्राँग झोन होता त्याची फिल्डिंग भावाच्या फिल्डिंगची सगळीकडं दहशद होती… पण याच 2011च्या वर्ल्डकपवेळी युवराजला कर्करोगाने जखडलं होतं…. सामना खेळत असताना युवराजनं अनेकदा रक्ताच्या उलट्या केल्या पण तरीही युवराज भारतासाठी वर्ल्डकप खेळत राहिला आणि शेवटी मॅन ऑफ द सिरीज ठरला… युवराजच्या या यशामागे अनेक लोकांचा हातभार आहे… पण त्याने मिळवलेलं यश त्याची अतुल्य इच्छाशक्ती आणि मेहनत याच्या जोरावर साध्य केलं हे मात्र खरं…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी