27 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरव्हिडीओVIDEO : युवराजच्या वडिलांनी सचिनचं स्वप्न केले पूर्ण

VIDEO : युवराजच्या वडिलांनी सचिनचं स्वप्न केले पूर्ण

क्रिकेटचा देवता असणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने एक नवा विक्रम केला आहे. अर्जुनने गोवा विरुद्ध राजस्थान या रणजी सामन्यात शतक झळकावत त्याच्या वडिलांची बरोबरी केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांच्या तालमीत तयार झालेल्या अर्जुनच्या या खेळीमुळे सचिन तेंडुलकरचे आपल्या मुलाला खेळताना पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

सचिन रमेश तेंडूलकर या नावानं आपल्या टॅलेंटच्या जोरावर क्रिकेटच्या देवाची उपाधी मिळवली आहे. असं म्हणतात आयुष्यात एक बाप ज्या गोष्टी साध्य करतो त्याच्या मुलाने त्यापेक्षा वरचढं कामगिरी करावी अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. थोडक्यात सांगायचे तर सचिनने क्रिकेटमधले सर्वोत्कृष्ट स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्याचा मुलगा अर्जून सचिन तेंडूलकर त्यापेक्षा भारी क्रिकेट खेळणार का ? याची सर्वांना उत्सुकता होती. त्यात अर्जून पडला ऑल राऊंडर.. त्यामुळे अर्जूनला सचिनचे विक्रम मोडता येणार नाहीत या गोष्टीवर पैजा लावणारे महाभाग सुद्धा आपल्या क्रिकेट वर्तूळात आहेत. याच गोष्टीमुळे अर्जूनला पदार्पण करत असताना मोठ्या मानसिक दबावातून जावे लागले. दोन वर्षापूर्वी अर्जून आयपीएल ऑक्शनमध्ये समाविष्ट झाला होता. त्यावेळी त्याला मुंबईच्या संघाने विकतही घेतले. पण पट्ट्याला गेल्या दोन वर्षात एकही सामना खेळवला नाही. असंच काहीसं झालं मुंबईच्या रणजी संघातही. अर्जून संघात होता पण त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान काय मिळत नव्हते.

त्यावेळी स्वतः सचिन तेंडूलकरने दार ठोठावलं ते युवराज सिंगचं. आता सचिन आणि युवराजचे नाते आपल्याला माहिती आहे. सचिन जगत असलेलं 22 वर्षांचे विश्वचषक विजयाचे स्वप्न युवराजने रक्ताच्या उलट्या करत पुर्ण केले होते. त्यामुळे अर्जूनला घडविण्यासाठी वाटेल ती मदत करायला युवराज तयार होता. पण यावेळी सचिनला युवराजची नाही तर त्याचे वडिल आणि भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांची मदत हवी होती. योगराज सिंग यांनी अर्जूनला प्रशिक्षण द्यावे अशी सचिनची ईच्छा होती. अर्जूनला प्रशिक्षण देण्यापूर्वी योगराज सिंग यांनी त्याला एक कानमंत्र दिला. ‘तुला क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुझा बाप सचिन तेंडूलकर आहे हे तुला विसरून जावं लागेल.’ योगराज यांनी दिलेला हा कानमंत्र अर्जूनने अवलंबला आणि बुधवार 14 डिसेंबर रोजी झालेल्या गोवा विरुद्ध राजस्थान रणजी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अर्जूनने आपल्या बापाने 34 वर्षांपूर्वी रचलेल्या विक्रमाची बरोबरी केली.

हे सुद्धा पाहा

VIDEO : 2007 अन् 2011 साली आपण जिंकलो कारण संघात युवराज सिंग होता

VIDEO : अंगठ्याला दुखापत झालेली असतानाही रोहित शर्मा बॅटींगला उतरला

Video : करिअरच्या तिसऱ्याच सामन्यात 300 मारणारा करुण नायर गायब का झाला ?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!