30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'उलटी काळी बाहुली, टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू', विद्या चव्हाणांनी सुचवले शिंदेगटाला चिन्ह

‘उलटी काळी बाहुली, टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू’, विद्या चव्हाणांनी सुचवले शिंदेगटाला चिन्ह

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच आणखी वाढत चालला असून शिवसेना वि. शिवसेना संघर्षाची आग आणखी भडकत चालली आहे. त्यात आमदार, खासदारांच्या संख्याबळाच्या जोरावर शिंदे गट ‘आम्ही खरे शिवसैनिक’ असे म्हणत धनुष्यबाणावर आपला हक्क सांगू लागले आहेत. शिवसेनेची मूळ कार्यकारिणी, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उरलेले आमदार यांना सरळ धुडकावून लावत शिंदे गट स्वतःला मूळ शिवसेना असल्याचे भासवू लागली आहे, त्यावर सणसणीत उत्तर देत माजी आमदार विद्या चव्हाण यांनी शिंदे गटाला नवे चिन्ह सुचवले असून ‘एकनाथ शिंदेंना धनुष्यबाणच कशाला’ असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी शिंदे गटाला कोणते चिन्ह असावे याबाबत मत व्यक्त करीत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये चव्हाण लिहितात, एकनाथ शिंदेना धनुष्यबाणच कशाला..? जादूटोणा करून मुख्यमंत्री बनलेल्यांना “उलटी काळी बाहुली”…! “टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू” असे अनेक चिन्ह लाभदायक ठरतील”, असे म्हणून चव्हाण यांनी मिश्कील भाषेत टोला लगावला आहे.

पुढे चव्हाण लिहितात, जे चिन्ह “बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच आहे” ते घेण्याचा नाहीतर गोठवण्याचा “अघोरी प्रत्यत्न म्हणजे कुटील कारस्थान”.! असे म्हणून विद्या चव्हाण यांनी जोरजबरदस्तीने धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदेगटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाने संख्याबळ जास्त असल्याचे कारण पुढे करत धनुष्यबाणावर आपला हक्क सांगण्यास सुरूवात केल्याने आता नेमकी शिवसेना कोणाची असा प्रश्न जनतेत वाद वाढवू लागला आहे.

हे सुद्धा वाचा…

नव्या सरकारच्या राज्यात चाललंय तरी काय…? 24 दिवसांत तब्बल 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

देशात ‘मंकीपाॅक्स’चा धोका वाढला, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

मुंबई लवकरच होणार खड्डेमुक्त?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी