38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रविलासराव देशमुखांचा ठाम विश्वास, कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही

विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास, कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही

टीम लय भारी 

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) साहेब यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी विलासराव देशमुखची जुनी भाषणे शेअर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. पहा हा व्हायरल व्हिडीओ… Vilasrao Deshmukh old video

२८ डिसेंबर १८८५ रोजी, काँग्रेसची स्थापना झाली. पंडित नेहरु हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होय. त्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताने मोठी प्रगती केली. राजीव गांधींनी देशात संगणक क्रांती व दूरसंचार क्रांती आणली. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान विकसीत करून देशाच्या विकासाला गती आणली. या देशाच्या जडण-घडणीत कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मोठं अपयश आले. अनेकांना वाटतं आहे की कॉंग्रेस आता संपली मात्र विलासराव देशमुख यांनी आपल्या जुन्या व्हिडीओत कॉंग्रेस ही जनसामान्यांची चळवळ आहे असं म्हटलं आहे. विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास होता की कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही. जे लोक कॉंग्रेस संपवण्याची भाषा करतात ते संपतील पण कॉंग्रेस नाही.

स्व विलासराव (Vilasrao Deshmukh) यांनी आपल्या भाषणात असं म्हणतात की,काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे.काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही यांच्या या विधानाची सहज आठवण झाली. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या वल्गना केल्या. मात्र हे सोप्प काम नाही.

हे सुद्धा वाचा: 

ईडीचा छापा पडताच ‘सूडबुद्धीची कारवाई’चा गजर सुरू : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

‘Kiske Achhe Din Aaye?’: Congress’ 8 Questions On PM Modi’s 8 Years In Power

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी