28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रदिवंगत विलासराव देशमुख यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात

दिवंगत विलासराव देशमुख यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात

टीम लय भारी 

लातूर : बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव दगडोजीराव देशमुख (Vilasrao Deshmukh)  हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आज २६ मे रोजी विलासराव देशमुख यांची ७७ वी जयंती आहे. हा मनाचा निरागस नेता महाराष्ट्राने गमावला मात्र आजही प्रत्येकांच्या मनामनामध्ये त्यांचे अढळ स्थान आहे. राजकारणातील या राजहंसाचा ‘तो’ मोबाईल नंबर आजही सुरु असून, आजही ते लगेच फोन घेतात. (Vilasrao Deshmukh’s phone is still on today)

दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांना फोन करा, आजही ते लगेच फोन घेतात. असं बोलंल जात. मात्र ही बाब तितकीच खरी आहे आणि यामागील पार्श्वभूमीही तितकीच अनोखी आहे. कारण विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे कितीही मोठ्या पदावर पोहचले असले किंवा कामात जरी असले तरी विलासराव हे त्यांना आलेले फोन स्वत: लगेचच उचलायचे. विलासराव देशमुख यांना लोकांमध्ये राहून त्यांच्याशी संवाद साधायला आवडत असे. ते प्रत्येकांसोबतच शांतपणे न रागवता संवाद साधायचे. त्यांच्या या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांच्याशी अनेकजण थेट संवाद साधायचे.

त्यांची हीच सवय कायम रहावी आणि इतक्या दिलदार नेत्याचे स्थान महाराष्ट्राच्या मनात कायम राहण्यासाठी देशमुख कुटूंबियांनी विलासराव देशमुख यांचा तो नंबर आजही सुरु ठेवला आहे.  विलासराव (Vilasrao Deshmukh) यांचा ९८२११२५००० हा मोबाईल नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. फोन लावल्यानंतर त्यांची गाजलेली भाषणे ऐकायला मिळतात. लातूर आणि ग्रामीण भागातील अनेक मंडळी विलासराव देशमुख यांना थेट फोन करत . त्यामुळे विलासरावांबद्दलचं लोकांच्या मनात असणारं हे प्रेम पाहून त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवण्यात आलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)


हे सुद्धा वाचा : 

भाजप नेत्यांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाणांचा उदो उदो करावा, देवेंद्र फडणविसांचा काहीच संबंध नाही !

Video : मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

अमोल कोल्हेंनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘लय भारी’च्या नव्या लोगोचे अनावरण, चव्हाण यांनी केले तोंड भरून कौतुक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी