महाराष्ट्रमुंबईराजकीय

मुंबईत दंगली घडाव्यात हा भाजपचा उद्देश होता का? राष्ट्रवादीचा जोरदार घणाघात

९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh thapar) यांनी दिले आहे.

टीम लय भारी 

मुंबईत दंगली घडाव्यात हा भाजपचा उद्देश होता का? राष्ट्रवादीचा जोरदार घणाघात

मुंबई : विरोधी पक्षनेते BJP देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भामध्ये काही ट्विट केले होते. याट ट्विटला महेश तपासे (NCP Mahesh thapar) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तपासे म्हणतात कीपवारसाहेबांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? Was it BJP’s intention to cause riots in Mumbai?

९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस BJP यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP Mahesh thapar) यांनी दिले आहे.कालच्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब जातीवादी आहेत असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीवादी घोषित करणे एवढंच भाजपकडून BJP बाकी होतं आणि त्याची सुरुवात भाजपचा नवीन फ्रंटमॅन राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली आहे असेही महेश तपासे  म्हणाले. गेल्या ५०-५५  वर्षात देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब यांनी समाजातल्या मागासलेल्या, अशिक्षित, दुर्बल अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं सकारात्मक काम केलेले आहे.

हे करत असताना जात आणि धर्म हे कधीच पाहिले नाही याची माहिती महेश तपासे यांनी दिली.महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान पवारसाहेबांनी ३७० पेक्षा शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी हे महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचे आहे असे विधान केले होते. त्या गोष्टीचा विपर्यास करून BJP देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपले ट्विट केले आहे असं ही तपासे यांनी म्हटले आहे.

हे सुध्दा वाचा: 

महाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही – महेश तपासे

Day after protest by MSRTC workers, NCP demands Sharad Pawar’s security be upgraded

अमोल मिटकरी चुकून राजकारणात आले असल्याचा भाजपचा प्रवक्ते राम कुलकर्णींचा टोला

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close