33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'एनसीपी'सोबत काम करतांना आमची घुसमट होते !

‘एनसीपी’सोबत काम करतांना आमची घुसमट होते !

टीम लय भारी

मुंबई : एनसीपीसोबत काम करतांना आमची घुसमट होते, अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी दिली. गुवाहाटीला पळून गेलेल्या एकनाथ शिंदेच्या गटाची आज गुवाहाटीमधील हाॅटेल रेडीसमध्ये पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेत बोलण्याचे अधिकार एकनाथ शिंदे गटाने दिपक केसरकर यांना दिले आहे. त्यानुसार त्यांनी प्रसारमाध्यमांशी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत संवाद साधला.

यावेळी बोलतांना दिपक केसरकर म्हणाले की, आमचा गट शिवसेनेतून बाहेर पडलेला नाही. आमच्या गटाविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. आम्ही ज्या युतीसोबत लढलो, त्या युतीसोबतच राहण्याची आमची इच्छा आहे. याविषयी आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सूचवले. मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही.

वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय आम्ही स्वतः घेतला. आम्ही सर्व आमदार मिळून आम्ही घेतलेल्या आमच्या मतावर ठाम आहोत. घटनात्मक तरतूदीनुसार लागणारे दोन तृतीयांश ,बहुमत आमच्याकडे आहे. 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 नेते एकत्र येवून बदलू शकत नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांचा निर्णय आम्हाला मान्य नाही. या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. संजय राऊत रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात ते चुकीचे आहे.

आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका. आम्ही शिवसेनेच्या विधीमंडळाचे सदस्य आहोत. आमचा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा नाही. आम्ही मीटिंगला गेलो नाही म्हणून नोटीस पाठवली. आम्ही त्याला नोटीशीला रितसर देवू.

शिवसेनेला कोणीही हायजॅक केले नाही. आमच्या आमदार, खासदारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. ‘शिवसेना बाळासाहेब‘ या गटाच्या नावावर निवडणूक आयोग निर्णय घेईल. आम्हाला 48 तासांच्या आत मुंबईत परत येण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. रविवार असल्याने आम्ही आठवड्याचा वेळ घेणार आहोत. आम्ही महाराष्ट्रात आलेच पाहिजे. महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारण्याची आम्ही वाट पाहत आहोत. महाराष्ट्रात यायला सुरक्षित वाटत नाही.

आमच्या आमदारांच्या ऑफिसची तोडफोड बंद करावी. नोटीसा म्हणजे लोकशाहीची हत्या आहे ज्यावेळी परिस्थिती बदलेल, त्यावेळी आम्ही परत येवू. आम्हाला कोणत्याही पक्षात विलीन व्हायचे नाही. ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात तोडफोड करायला सांगितले त्याच्यावर कारवाई झालेली नाही. अजूनही आमच्या म्हणण्याचा विचार करावा. आम्ही बाळासाहेब शब्द न वापरता नुसते शिवसेना ठेवू.

‘तुम्ही तुमच्या बापाच्या नावे मतं मागा.’ या संजय राऊतांच्या विधानावर उत्तर देतांना ते म्हणाले की, जे पक्ष अधिक चांगला उमेदवार देतात. ते कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले तरी निवडून येतात. कारण त्यांच्या कामामुळे मतदारसंघातले लोक त्यांना ओळखतात. उध्दव ठाकरे प्रत्येकाला समजून घेतात. पण काम करायला वेळ घेतात. त्यामुळे पक्षात नाराजी वाढली. याशिवाय उघड न करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

आम्हाला शिवसेनेला फोडायचे नाही. एनसीपीसोबत काम करतांना आमची घुसमट होते. आम्ही कोणीही उध्दव साहेबांच्या विरोधात नाही. आदित्य ठाकरेंना देखील आम्ही याबाबत समजावून सांगितले होते. महाराष्ट्र मोठा होईल त्यावेळी भारत मोठा होईल. सगळी चांगली खाती राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडे आहेत. मुख्यमंत्री पद घेवून शिवसेना संपणार आहे असे वाटल्याने आम्ही हे बंड केले. आम्हाला विश्वासात घेतले नाही, म्हणून हा उद्रेक झाला.

आम्ही गुवाहाटीला फूकट राहत नाही. आमच्या पैशावर आम्ही राहतोय. आमचा खर्च कोणी करत नाही. यामागे भाजप नाही. एकनाथ शिंदे आमचा राहण्याचा हाॅटेलचा, विमानाचा खर्च करत आहेत. फडणवीस उध्दव ठाकरेंनी सांगितल्यावर लगेच काम करत होते. ईडीची भीती सगळ्यांना वाटतं नाही. त्यांना प्रेमाची कमतरता होती. बरेच आमदार पैसेवाले नाहीत. शेतकरी आहेत. आम्ही नेते म्हणून सर्वाधिकार शिंदेना दिलेले आहेत. आम्हाला चांगली खाती हवी आहेत. आमच्या गटाकडून सगळ्या वाटाघाटी एकनाथ शिंदे करतात. आम्हाला जी खाती मिळतील, त्यांना न्याय देवू. आम्हाला शिवसेनेला आणि महाराष्ट्राला मोठं करायचे आहे.

हे सुध्दा वाचा :

संजय राऊतांचे तोंड बंद करा, दीपक केसरकरांचे विधान

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर ‘मिम्स’चा पाऊस

VIDEO : शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते खवळले, गद्दार कुत्र्यांनो अडीच वर्षे पदे घेताना लाज वाटली नाही का ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी