29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रदहीहंडी, गणेशोत्सवाबाबत नवे सरकार काय निर्णय घेणार?

दहीहंडी, गणेशोत्सवाबाबत नवे सरकार काय निर्णय घेणार?

टीम लय भारी

मुंबई : दहीहंडी, गणेशोत्सव राज्याचे लाडके सण. मोठ्या आतुरतेने लोक या सणांची वाट पाहत असतात. गेले दोन वर्षे कोरोनामुळे मात्र राज्यातील जनतेला या सणांचा आनंद लुटता आला नाही. दरम्यान कोरोना संकट ओसरले पण राज्यात राजकीय वादंग सुरू झाला आहे, त्यामुळे या सगळ्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी दहीहंडी, गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात सण समारंभ सुरू लागले आहेत. राज्यातील जनतेला दहीहंडीची आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना संकट पूर्णपणे संपले नसले तरीही बऱ्यापैकी संकट नियंत्रणात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात हे सण साजरे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरीही सह्याद्री अतिथी सभागृहातील बैठकीकडे गोविंदाप्रेमी आणि गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा…

महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू, यावर कसा तोडगा निघणार?

मुंबईकरांनो तब्येतीची काळजी घ्या !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल, कोणत्या उमेदवाराला मिळणार पद?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी