28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातला 'पेचप्रसंग' कधी संपणार ?

महाराष्ट्रातला ‘पेचप्रसंग’ कधी संपणार ?

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. तर दुसरीकडे सत्ता संघर्षानंतरचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच राज्याचा गाडा हाकत आहेत. मात्र राज्याचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे. हा सत्ता संघर्षानंतरचा सत्ता पेच कधी संपणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

महाराष्ट्रात मागच्या महिन्यापासून सुरु असलेला सत्ता संघर्ष संपला आहे. मात्र मंत्रीमंडळ विस्तार लांबला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा कारभार केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हातात आहे. आज 11 जूलैला कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रीमंडळ वाटप होईल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण तसे घडले नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. या शिवाय अनेक प्रश्न खाते वाटप न झाल्यामुळे प्रलंबित राहिले आहेत. राज्याला लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची गरज आहे. केवळ सत्ता संघर्षांमुळे जनतेच्या प्रश्नांना कोणी वाली उरला नाही. आज कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र कोर्टाने निर्णय पुढे ढकलला आहे. त्याची तारीख देखील जाहीर केली नाही. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाअगोदर मंत्रीमंडळ विस्तार होईल की, नंतर होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेवू नये,असे आदेश कोर्टाने दिले आहेत. राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षांच्या घटना या संविधानिक दृष्टया खूप महत्वाच्या आहेत. आज नाही, उद्या नाही मग हा निर्णय कधी होणार? या प्रकरणात कोणालाही दिलासा मिळाला नाही. शिवसेनेच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, आता 16 आमदारांवर तूर्तास कारवाई नको, असा आदेश कोर्टाने दिला आहे. बंडखोर नेत्यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्याचे पत्र कोणालाही दिलेले नाही. तसेच बंडखोरांकडे कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुध्दा वाचा:

शिंदे गटातील आमदाराच्या गाडीला अपघात

ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टी? हर्षल प्रधान यांचा यंत्रणांना कडवट सवाल

संजय राऊतांचा बंडखोरांना टोला, ५० कोटी पचणार नाहीत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी