34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशिवसेनेची गळती थांबेना, शिंदे गटात अर्जुन खोतकर सामील होणार?

शिवसेनेची गळती थांबेना, शिंदे गटात अर्जुन खोतकर सामील होणार?

टीम लय भारी

जालना : शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून गळती सुरू झाली असून शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढू लागली आहे. माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर हे सुद्धा आता शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. शिवसेनेला बायबाय करून खोतकर शिंदे गटात 31 जुलैला प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेंची सुद्धा अर्जुन खोतकर भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर दिल्लीत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या भेटीनंतर खोतकर शिवसेनेला रामराम करून शिंदेगटात सामील होणार अशा चर्चा व्हायला  लागल्या. खोतकर शिवसेनेचे मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते म्हणून गणले जातात मात्र त्यांनी बंडखोरी करून शिंदे गटाला साथ देण्याचे ठरवलेच तर शिवसेनेची कोंडी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान अर्जून खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत, परंतु याबाबत खोतकरांकडून अधिकृत अशी माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे राजकीय पटलावरील या महत्त्वपूर्ण घडामोडी राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण देणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

महाराष्ट्रात आणखी एक जिल्हा निर्माण होण्याची शक्यता

उंदीर मारण्यासाठी बनवला विषारी टोमॅटो, महिलेकडून सेवन

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी