28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयराजन साळवींच्या उमेदवारीने बंडखोरांची 'लाज' चव्हाट्यावर येणार !

राजन साळवींच्या उमेदवारीने बंडखोरांची ‘लाज’ चव्हाट्यावर येणार !

टीम लय भारी

मुंबई : राज्यात नवीन सरकार सत्तेच्या गादीवर बसताच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीकरिता भाजपकडून राहुल नार्वेकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या आमदाराला उमेदवारी देण्यात आल्याने भाजपला देखील काही प्रमाणात धक्काच बसला आहे.

राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जयंत पाटील, अरविंद सावंत आणि सुनील प्रभू उपस्थित होते. राजन साळवी हे शिवसेनेचे निष्ठावंत असून ते राजापूर विधानसभेचे आमदार आहेत. २००९ पासून ते राजापूर विधानसभेत आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून देखील त्यांची लोकांमध्ये ओळख आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून सेनेचे राजन साळवी यांचे नाव पुढे आल्याने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत सेनेचे बंडखोर आमदार नेमके कोणाला मत देणार हे पाहावे लागणार आहे.

स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणणारे हे बंडखोर आमदार किमान आतातरी शिवसेनेच्या खाल्ल्या मिठाला जागून सेनेचे राजन साळवी यांना मतदान करणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सध्या भाजपमध्ये असलेले राहुल नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेना पक्षामधून केली होती. त्यामुळे आता बंडखोर आमदार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करून स्वतःला शिवसैनिक सिद्ध करणार की, भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले आमदार आजही स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवून घेत आहेत. पण शिवसेनेशी गद्दारी केलेले व्यक्ती हे कधीच सेनेचे असू शकत नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तथाकथित बाळासाहेबांचे शिवसैनिक यावेळी नेमके कोणाला मतदान करतील प्रश्न निर्माण झाला आहे. पण भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसविण्यात आल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील हे आमदार निश्चितच भाजपच्या बाजूने मतदान करतील हे सर्वश्रुत आहे.

दरम्यान, बंडखोरी केल्यानंतर या आमदारांनी सुरत वारी केली. त्यानंतर त्यांनी थेट गुवाहाटी गाठले. तिथे त्यांच्यातील एक आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीतल्या झाडांना, डोंगरांना आणि हॉटेलला इतके प्रसिद्ध केले की, त्यांच्या या वक्तव्यांवर गाणी देखील तयार करण्यात आली. या बंडखोर आमदारांनी आपले बस्तान गुवाहाटीतून गोव्यात हलवले. त्यानंतर या बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी या बंडखोर आमदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि गोव्यातल्या हॉटेलमध्ये या आमदारांनी धिंगाणा घातला.

बंडखोर आमदारांनी गेल्या काही दिवसात आपल्या वागण्यातून आपली स्वतःचीच लाज काढली आहे. जनतेमध्ये स्वतःची नाचक्की करून घेतली आहे. या आमदारांच्या बंडखोरीनंतर सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास देखील ढासळला आहे. पण तरीसुद्धा हे आमदार देश भ्रमंती करत फिरत आहेत. यावेळी ते आपण एका मतदार संघाचे प्रतिनिधी आहोत, हे विसरल्याचे दिसून आले आहेत.

हे सुद्धा वाचा :

लोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

तुमच्या ‘अश्रूंशी’ मी गद्दारी करणार नाही

बंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी