महाराष्ट्रराजकीय

जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त दादरमध्ये होणार व्यंगचित्र जत्रा

पाच मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील  दादरमध्ये जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त ४ मे ते 5 मे या दोन दिवशी व्यंगचित्र जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक तसेच कार्टूनिस्ट कम्बाईन यांच्या सहकार्याने व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

टीम लय भारी 

मुंबई :  पाच मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन (World Cartoon Day)  म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील  दादरमध्ये जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त ४ मे ते 5 मे या दोन दिवशी व्यंगचित्र जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक तसेच कार्टूनिस्ट कम्बाईन यांच्या सहकार्याने व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या व्यंगचित्र स्पर्धेला देश-विदेशातील स्पर्धकांकडून प्रतिसाद मिळत आहे. (World Cartoon Day will be held in Dadar cartoon fair) 

जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त दादरमध्ये होणार व्यंगचित्र जत्रा

काय आहे स्पर्धेचा विषय ?


‘रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ या विषयावर आधारित ही स्पर्धा होणार आहे. दैनंदिन आयुष्य जगताना आपण अनेक युध्दाच्या प्रसंगाचा सामना करतो. याशिवाय वाहतूक कोंडी, पशु, पक्षी, जलचरांच्या समस्या, वाढते शहरीकरण, आरोग्याच्या विविध समस्या, ढासळती कुटुंबव्यवस्था आदी समस्या आपल्याला भेडसावत असतात. याच विषयांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे रेखाटण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे.

४०० हून अधिक स्पर्धक विदेशातील आहेत


स्पर्धकांनी A4 आकाराची ३०० dpi असलेली इमेज [email protected] या इ मेलवर ३० एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडक व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन ‘व्यंगचित्र जत्रा’ या एका विशेष कार्यक्रमात ४ आणि ५ मे २०२२ रोजी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन, शिवाजीपार्क, दादर येथे भरवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत ६०० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ४०० हून अधिक स्पर्धक विदेशातील आहेत.


हे सुद्धा वाचा :

‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’ राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पुण्यात बॅनरबाजी

एका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप – नारायण राणेंवर निशाणा !

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं केलं कौतुक

National Cartoonist Day, May 5: Caricatures, comic strips mesmerise young and old alike

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close