28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeजागतिक'हे' आहेत जगातील आतापर्यंतचे १० शक्तिशाली भूकंप

‘हे’ आहेत जगातील आतापर्यंतचे १० शक्तिशाली भूकंप

सोमवारी (दि.६) रोजी तुर्की (Turkey), सिरीयामध्ये (Syria) झालेल्या शक्तिशाली भूकंपात (earthquakes)आतापर्यंत ५ हजार लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. सिरीयातील ज्या प्रदेशात गृहयुद्ध सुरु आहे त्या प्रदेशात भुकंपाचे धक्के बसले आहेत. तर तुर्कीमध्ये देखील या विनाशकारी भुकंपाने अनेकांचा बळी घेतला आहे. जगभरातून भुकंपग्रस्त देशांना मदतकार्य केले जात आहे. अशाच भूकंपाच्या विनाशकारी घटना जगभरात या आधी देखील घडल्या होत्या. त्यातील 10 शक्तिशाली भूकंपांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (10 most powerful earthquakes in the world)

१०. सुमात्रा भूकंप (२०१२)

सुमात्रामध्ये ११ एप्रिल २०१२ रोजी (Sumatra Earthquake 2012) झालेला हा एक शक्तिशाली भूकंप मानला जातो. हा भुकंप ८.६ रिश्टर तीव्रतेचा होता. इंडोनेशिया देशातील आचे शहराजवळ या भुकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू मानवी वस्तीपासून दुर होता. मात्र भूकंपामुळे काही प्रमाणात त्सुनामी निर्मान झाल्याची नोंद आहे. या दुर्घटनेमध्ये १० लोकांचा मृत्यू त १२ जण जखमी झाल्याची नोंद आहे.

९. आसाम-तिबेट भूकंप (१९५०)

तिबेटच्या झिंझांग आणि भारत सिमाभागात १५ ऑगस्ट १९५० रोजी हा भूकंप झाला (Assam-Tibet Earthquake 1950). हा भुकंप ८.६ रिश्टर तीव्रतेचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटमध्ये होता. या भूकंपामुळे दीड हजार ते तीन हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या भूकंपामुळे झालेल्या भुस्खलन झाले आणि त्यानंतर आठ दिवसांनी सुबनसिरी नदीवरील धरण फुटल्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांमधील ५३६ लोकांचा मृत्यू झाला होता.

८. रॅट आयलंड भूकंप (१९६५)

रॅट आयलंड येथे ४ फेब्रुवारी १९६५ साली हा भूकंप झाला होता (Rat Island Earthquake 1965). या भूकंपामुळे अलास्का, शेम्या बेटांवर त्सुनामी लाटा निर्मान झाल्या होत्या मात्र हे मानवी वस्ती जवळपास नसल्याने जीवितहानी झाली नाही.

७. इक्वेडोर-कोलंबिया भूकंप (१९०६)

कोलंबियामध्ये ३१ जानेवारी १९०६ रोजी इक्वाडोरच्या किनाऱ्याजवळील एस्मेराल्डास या शहराजवळ ८.८ रिश्टरचा भूकंप झाला (Ecuador-Colombia earthquake of 1906). या भूकंपामुळे १६ फुट उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा निर्मान झाल्या होत्या.

६. चिली भूकंप (२०१०)

27 फेब्रुवारी २०१० साली चिली मध्ये ८.८ रिश्टरचा भूकंप झाला होता. (Chile earthquake 2010) त्याला मौले भूकंप असे देखील म्हटले जाते. चिलीच्या किनारपट्टी भागात हा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे त्सुनामी लाटांची निर्मिती होऊन चिलीमधील किनारपट्टीच्या शहरांचे मोठे निकसान झाले. तसेच चिलीची राजधानी सॅँटियागोसह अनेक शहरातील इमारती कोसळून लोकांचे मृत्यू झाले होते. सन २०११ साली तेथील प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार या दुर्घटनेमध्ये ५२५ जणांचा मृत्यू आणि २५ जण बेपत्ता झाले होते.

५. रशिया भूकंप (१९५२) 

रशियामधील कामचटका येथे ४ नोव्हेंबर १९५२ साली झालेल्या ९.० रिश्टर या शक्तीशाली भूकंपामुळे किनारी भागात मोठे नुकसान झाले होते. (Russia Earthquake 1952) भूकंपामुळे जवळपास ५० फुट उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या विनाशकारी भूकंपामध्ये जवळपास १० ते १५ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या भूकंपामुळे हवाई बेटांवरील प्रदेशात देखील नुकसान झाले. तसेच चिली, पेरू न्यूझीलंडपर्यंत त्सुनामी लाटा गेल्या.

४ जपान भूकंप (२०११)

जपानमधील तोहोकू येथे ११ मार्च २०११ रोजी समुद्र किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर समुद्राखाली भूकंपाचा जोरदार हादरा बसला. (Japan Earthquake 2011) हा भुकंप ९.१ रिश्टरचा होता. या भुकंपामुळे १३३ फुट उंचीच्या त्सुनामी लाटा निर्मान झाल्या. या दुर्घटनेत हजारो इमारती कोसळल्या. एक धरण नष्ट झाले. जपानमधील तीन अनुभट्ट्यांचे नुकसान झाले. सन २०१५ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेमध्ये १५ हजार ८९४ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ६,१५२ लोक जखमी झाले आणि जवळपास अडीच हजार लोक बेपत्ता झाल्याचे घोषीत करण्यात आले होते.

३. सुमात्रा भूकंप (२००४)

सुमात्रा येथे २६ डिसेंबर २००४ साली आतापर्यंतच्या भयंकर अशा भुकंपापैकी एक भूकंप झाला. हा भूकंप ९.१ रिश्टरचा होता. (Sumatra Earthquake 2004) सुमात्रा इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुले १०० फुट उंचीच्या त्सुनामी लाटा निर्मान झाल्या. या आपत्तीमध्ये 2, 27,898 लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपामुळे पृथ्वीवर १ सेंटिमीटर धरणीकंप जाणवला होता.

२. ग्रेट अलास्का भूकंप (१९६४)

गुड फ्रायडे भुकंप म्हणून ओळखला जाणार २७ मार्च १९६४ रोजी अलास्कामधील प्रिन्स विल्यम साऊंड प्रदेशात अतिशय शक्तिशाली असा भूकंप झाला. (Great Alaska Earthquake 1964) ९.२ रिश्टर अशी या भूकंपाची नोंद झाली होती. गुड फ्रायडेच्या दिवशी हा भूकंप झाल्याने गुड फ्रायडे भूकंप म्हणून याला ओळखले जाते. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंप अशी याची नोंद आहे. या भूकंपामुळे समुद्रात २७ फुट उंच लाटा उसळल्या. या भुकंपामुळे चेनेगा गावातील २३ लोकांचा मृत्यू झाला. येथे ६८ लोक राहत होते. पोर्ट वाल्डेझ येथे देखील ३० लोक मृत्युमुखी पडले. या भुकंपामुळे एकुण १३९ लोक मृत्यू झाल्याची नोंद आहे.

१. वाल्दिव्हिया भूकंप (१९६०)

ग्रेट चिली भूकंप हा आजवरच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंप म्हणून ओळखला जातो. २२ मे १९६० साली हा भूकंप झाला. (Valdivia Earthquake 1960) ९.५ रिश्टर इतकी या भुकंपाची तीव्रता नोंदविली गेली. चिलीच्या समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे १६० किमी दूर वाल्दिव्हिया शहराच्या जवळ हा भूकंप झाला. या भूकंपामुळे ८२ फुट उंचीच्या त्सुनामी लाटा निर्मान झाल्या. या लाटा हवाई, हिलो पर्यंत पोहचल्या. या लाटा इतक्या शक्तिशाली होत्या की, त्यांची तीव्रता तब्बल १० हजार किलोमीटर जपान आणि फिलीपिन्सपर्यंतही नोंदवल्या गेल्या. या भूकंपामुळे झालेल्या मृतांची अधिकृत आकडेवारी समोर आली नसली तरी जवळपास १ हजार ते ६००० लोक मृत्यू पावल्याचा तर तीन हजार लोक जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानची माणूसकीला काळीमा फासणारी कृती; भुकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीला जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानाला परवानगी नाकारली

तुर्की, सिरीयातील शक्तीशाली भूकंपात आतापर्यंत २३०० लोकांचा मृत्यू

तुर्कस्तान, सीरिया हादरले : भूकंपात ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, ३४ इमारती जमीनदोस्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी