११ सप्टेंबर २०११ या दिवशी जगात शक्तीशाली राष्ट्र अशी बिरूदावली म्हणून मिरवणाऱ्या अमेरिका देशावर अचानक एकाएकी दहशतवाद्यांचा मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यानी चार अमेरिकन विमाने हायजॅके केली. त्यापैकी दोन विमानांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेतील लाखो निष्पाप नागरिक मारले गेले. हा दिवस गेली २३ वर्ष जगभरात दहशतवादी आत्मवृत्तीचा नायनाट करण्यासाठी आणि हुतात्माचे वंदन करण्यासाठी पाळला जातो.
नेमकी घटना काय?
आर्थिक बलवत्तेसाठी आणि जगभरात शक्तीशाली राष्ट्र होण्यासाठी अमेरिकेने भारतीय उपखंडातील मुस्लिम राष्ट्रानमधील अंतर्गत वादात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती. प्रत्यक्षात अरब राष्ट्रतील तेलाच्या खाणी बळकावण्यासाठी अमेरिका अरब राष्ट्रात घुसखोरी करू पाहतेय, असा राजकीय तज्ज्ञाचा सूर होता. अमेरिका अरब राष्ट्रातील अंतर्गत व्यवहारात घुसखोरी करू पाहतेय यावर ‘अल कायदा’ या अतिरेकी संघटनेने विरोध केला. अमेरिकेने हस्तक्षेप थांबवला नाही तर अमेरिकेविरोधात ‘अल कायदा’ दहशतवादी कारवाया करेल, अशी जाहीर घोषणा कुख्यात दहशतवादी आणि ‘अल कायदा’चे प्रमुख ओसामा बिन लादेन याने अमेरिकेत हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
‘अल कायदा’च्या दहशतवाद्यानी ११ सप्टेंबर २०११’ रोजी चार प्रवासी विमानांचे अपहरण केले. त्यापैकी दोन विमाने अतिरेक्यानी दिवसाढवळ्या थेट न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये घुसवली. या हल्ल्यात वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली. तर लाखो अमेरिकेन नागरिक मारले गेले. या हल्ल्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांचाही मृत्यू झाला. जगभरातून या भ्याड हल्ल्याचा कडाडून विरोध झाला. अल कायदा आणि ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने सैनिकांची मोठी फौज उभारली. भारतासह अनेक राष्ट्रानी अमेरिकेला जाहीर पाठींबा दिला.
अमेरिकेने पाकिस्तानात मोठे सैन्यदळ उभारले पण ओसामा बिन लादेनचा पत्ता काही सापडेना. या हल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानाला आर्थिक रसद पुरवणं बंद केलं. लादेन पाकिस्तानात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती अमेरिकेन सैनिकांना होती. पाकिस्तान, अफगाणिस्तान येथे सेटलाईटच्या माध्यमातून अमेरिका लादेनचा ठावठिकाणा शोधत होती. ‘अल कायदा’ची अनेक प्रशिक्षण स्थळे अमेरिकेत फायटर विमानांनी बॉम्बहल्ला करत उध्वस्त केली. लादेन काही केल्या अमेरिकेन सैनिकांना सापडत नव्हता.
हे ही वाचा
आजी-आजोबांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय
‘ये दिल मांगे मोअर’… कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पाकिस्तानी सैन्याने घेतला होता धसका
खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके भारतासोबत!- ऋषी सुनक
अखेरीस अकरा वर्षानंतर अमेरिकन सैनिकांना लादेनचा खात्रीलायक पत्ता सापडला. अकरा वर्षांनी लादेनला शोधण्यात अमेरिकन सैन्याला यश आले. लादेन पाकिस्तानातील ओबाटाबाद येथे लपून बसल्याची पक्की खबर अमेरिकन सैनिकांना मिळाली. २ मे २०११ रोजी रात्री उशिराने अमेरिकेन सैनिकांनी ओसामाच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात सैनिकांनी लादेनला जागीच ठार केले.