28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeजागतिकTakeoff : अमेरिकन रॅपर टेकऑफचा गोळीबारात मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का

Takeoff : अमेरिकन रॅपर टेकऑफचा गोळीबारात मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का

प्रसिद्ध अमेरिकन रॅपर टेकऑफचा गोळी लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. टेक्सासमधील हॉस्टन शहरातमध्ये ही घटना घडली. 28 वर्षांचा टेकऑफ हा त्याच्या गाण्यांमुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेझ होती.

प्रसिद्ध अमेरिकन रॅपर टेकऑफचा गोळी लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. टेक्सासमधील हॉस्टन शहरातमध्ये ही घटना घडली. 28 वर्षांचा टेकऑफ हा त्याच्या गाण्यांमुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेझ होती. टेकऑफच्या मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काही तरुण ‘डाइस’ हा खेळ खेळत असताना झालेल्या वादातून तरुणांनी गोळीबार केला, या गोळीबारात टेकअऑफसह आणखी दोघेजण जखमी झाले होते. त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे टेकऑफच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, ही घटना घडण्याआधी टेकऑफने त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले होते. सुद्धा टेकऑफचा चाहतावर्ग खुप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 80 लाख फॉलोअर्स आहेत. तसचं ‘मिगोस’ नावाच्या फेमस अमेरिकन म्युझिक ग्रुपचाही तो सदस्य आहे. या ‘मिगोस’ ग्रुपच्या युट्यूब चॅनलचे 12 लाखांहून अधिक सब्स्क्राईबर्स आहेत. नुकताच टेकऑफचा ‘मेसी’ हा म्युझिक व्हिडिओ सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
– हॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सनी वाहिली श्रद्धांजली
टेकऑफला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या हॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. लिल पंपने इंस्टाग्रामवर लिहिले आहे, “सदैव एक आख्यायिका, मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. “म्युझिक एक्झिक्युटिव्ह कोल बेनेट यांनी ट्विट केले, “आता काहीही अर्थ नाही.काहीच नाही.” तर हॉलिवूड अभिनेत्री मासिका कलिशा म्हणाली की “टेकऑफ कोणालाही त्रास देत नाही आणि मार्गाबाहेर जातो.” बॉक्सर क्रिस उबँक जूनियर याने सुद्धा रॅपरल श्रद्धांजलि दिली आहे की “मला आठवत आहे की टेकऑफ जमिनीशी किती जोडलेले व्यक्ती होते, खुप कूल डूड होते.”
हे सुद्धा वाचा:
Eknath Shinde : ऑक्टोबरमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचीही शेतकऱ्यांना मदत मिळणार

PM Narendra Modi : हे सरकार गोरगरीबांना हालअपेष्ठांमध्ये सोडणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

Nitesh Rane : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत लक्षात ठेवा, नितेश राणेंचा हल्लाबोल

– अशी झाली रॅपिंग करिअरची सुरूवात
किर्शनिक खारी बॉल (टेकऑफ) याचा जन्म 1994 साली लॉरेन्सविले, जॉर्जिया येथे झाला. हा एक अमेरिकन रॅपर होता. 2008 साली त्याने पोलो क्लब या सामूहिक नावाने क्वावो आणि ऑफसेट यांच्या सोबतीने आपल्या रॅपिंग करिअरची सुरुवात केली. मिक्सटेप जुग (मिगोस’) हा पहिला सीझन त्यांनी रिलीज केला. मिगोसचा तिसरा सदस्य रॅपर टेकऑफच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर, त्याचे सर्व चाहते आणि हितचिंतक सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी