चीनचे ‘जुसँग’ नावाचे रोव्हर मंगळभूमीवर अनेक महिन्यांपासून निपचित पडलेले आहे. ते एक इंचही पुढे सरकलेले नाही. धुळीची वादळे, अत्याधिक थंड वातावरण यामुळे सौरऊर्जेवर संचालित होणारे हे रोव्हर गेल्या वर्षीपासून निष्क्रिय पडले आहे. या उपकरणांकडून अन्य कोणतेही संकेत येत नसल्यामुळे Tianwen-1 मार्स ऑर्बिटरमध्ये संप्रेषण त्रुटी येत असल्याचे निष्पन्न झाले आणि चीनची पहिली वाहिली मंगळ मोहीम असफल ठरल्याचे चित्र दिसून आले. (China’s First Mars mission is failed!)
अमेरिकेच्या ‘नासा’ (NASA) ने दिलेल्या माहितीनुसार, नासाचा मार्स रीकॉन्सेन्स ऑर्बिटर हा उपग्रह मंगळभोवती फिरत असताना तो मंगळाच्या पृष्ठभागाचा आणि हवामानाचा अभ्यास करतो. नासाच्या या कक्षेत त्याने चीनी रोव्हरची काही छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांच्या एका सीरिजचे निरीक्षण करता हे रोव्हर किमान 20 सप्टेंबर 2022 पासून एक इंचही पुढे सरकलेले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठातील हायराईज टीमनेच्या मते, हे मार्स रोव्हर खराब झालेले असून ते आता कधीही काम करू शकणार नाही अशीच चिन्हे आहेत. मार्स रिकनायसन्स ऑर्बिटरच्या हायराईज कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रात हे रोव्हर गुलाबी रंगाच्या बिंदूसारखे दिसून येते.

मंगळभूमीवरील युटोपिया प्लॅनिशियाच्या आसपासच्या क्षेत्रात हे रोव्हर असून त्याच्याजवळ एक खड्डाही आहे. पहिले छायाचित्र 11 मार्च 2022 चे, दुसरे 8 सप्टेंबर 2022 चे आणि सर्वात ताजे छायाचित्र 7 फेब्रुवारी 2023 चे आहे. या सर्व छायाचित्रांमध्ये हे रोव्हर एकाच ठिकाणी दिसत आहे. अर्थात खुद्द चीनने जुराँग रोव्हरशी संबंधित कोणतीही माहिती जगाला दिलेली नाही ! चीनचे सरकार ज्याप्रमाणे सर्व बाबतीत गोपनीयता बाळगते तसेच चिनी अंतराळ संस्थाही आपल्या सर्व गोष्टी गुप्तच ठेवते. कॅनडा येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने Tianwen-1च्या एकूण कामाचा अंदाज नेमका होता याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
#TIANWEN1 ground station seems to have given up as the spacecraft passes the Doppler reversal and is rapidly approaching periareion. The distinct difference in the rapidly changing curve and the slower strong curve suggests to me the g/s is expecting the s/c in a different orbit. pic.twitter.com/9UtiO9GfrD
— Scott Tilley 🇺🇦 (@coastal8049) January 9, 2023
हे सुद्धा वाचा : ISRO देणार तुमच्या मुलांना मोफत शिक्षणाची संधी; आजच अर्ज करा
NASA : अरे बापरे ! नासा लवकरच मानवी पुतळे चंद्रावर पाठवणार
दरम्यान आता 2025 च्या सुमारास चीनने टियानवेन -2 हे संयुक्त पृथ्वी जवळील लघुग्रह नमुना-पुनरुत्थान आणि मुख्य बेल्ट धूमकेतू रेंडेझव्हस मिशन सुरू करण्याची योजना आखली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.