31 C
Mumbai
Thursday, December 7, 2023
घरजागतिकएलन मस्क ट्विटरचे सीईओपद या महिलेकडे सोपविणार !

एलन मस्क ट्विटरचे सीईओपद या महिलेकडे सोपविणार !

ट्विटर मायक्रोब्लॉगिंग साईटचे मालक एलन मस्क यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ते ट्विटरे सीईओपद सोडणार असून सीईओपदासाठी एका महिलेची नियुक्ती केली जाणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. यामध्ये त्यांनी महिलेचे नाव जाहीर केले नसले तरी माध्यमांमध्ये लिंडा याकारिनो यांचे नाव चर्चेत आहे.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ट्विटरसाठी नवा सीईओ निवड झाल्याचा मला अत्यंत आनंद झाला आहे. नवनियुक्त सीईओ 6 आठवड्यामध्ये पदभार स्विकारतील असे देखील त्यानी म्हटले आहे. सीईओपदावर नवी व्यक्ती आल्यानंतर मस्क ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीटीओ या जबाबदाऱ्या सांभाळतील.

लिंडा याकारिनो या एनबीसी युनिव्हर्सल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग अँड पार्टनरशिप विभागाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी कंपनीच्या डिजिटल जाहिरात विभागात काम केले आहे. गेल्या 11 वर्षांपासून त्या या कंपनीत काम करत आहेत. त्या आधी त्यांनी टर्नर कंपनीत १९ वर्षे काम केले. येथेही त्यांनी जाहिरात विक्री, विपणन आणि संपादन विभागात कार्यकारी उपाध्यक्ष म्हणजेच सीओओ जाहिरात म्हणून काम केले. लिंडा याकारिनो या उच्चशिक्षित असून त्यांनी पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आहे. या विद्यापीठामधून त्यांनी लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनची डिग्री घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांनी विधान भवनाला घेराव घातला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

2024 नंतर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात; आतापर्यंत काँग्रेसमधील चौकडीमुळे त्यांचे नाव मागे पडले : यशवंतराव गडाख

आर्यन खानप्रकरणात समीर वानखेडे गोत्यात; सीबीआयने केला भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी