31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeजागतिकपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे दीर्घ आजाराने निधन

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे दीर्घ आजाराने निधन

भारतावर कारगिल युद्ध लादणारे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे रविवारी निधन झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील जिओ न्युजने दिले आहे . २००१ ते २००८ या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर २०१६पासून दुबईतील अमेरिकन रुग्णालयात उपचार सुरु होते. (Former President of Pakistan Pervez Musharraf passed away after a long illness) पाकिस्तनचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी परवेज मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख पदावरुन हटविले. त्यांच्याजागी लष्करप्रमुख म्हणून जनरल अजीज यांची नेमणूक करण्यात आली. पण जनरल अजीज हे परवेज मुशर्रफ यांचे विश्वासू सहकारी असलायची नवाज शरीफ यांना कल्पनादेखील नव्हती. त्यानंतर सत्तानाट्य घडले आणि मुशर्रफ यांनी लष्करी बाळाचा वापर करत सत्ता काबिज केली. नवाज शरीफ यांची सत्ता उलथवून टाकली.

दिल्ली आणि इस्लामाबादमधील तणावपूर्ण संबंध सुधारावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र ते प्रयत्न निष्फळ ठरले होते. दोन्ही देशांतील संघर्षाचे कारण असलेला काश्मीर मुद्द्यावर परवेज मुशर्रफ यांच्या राजकीय कारकिर्दीत तोडगा निघण्याची चिन्हे दिसत असतानाच उभयपक्षी सुरु असलेल्या शांती प्रक्रियेत बाधा निर्माण झाली. त्यामुळे मुशर्रफ यांचे हे प्रयत्न सफल झाले नाहीत. २०१३ मध्ये संसदेच्या जागेसाठी ते पाकिस्तानात परतले होते. पण त्यांना अपात्र ठरविण्यात आले. २०१६ मध्ये त्यांना दुबईत जाण्याची परवानगी देण्यात आली.

ब्रिटिशकालीन भारतात जन्म
परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ साली ब्रटीशकालीन भारतातील दिल्लीत झाला होता. १९४७ साली फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब दिल्लीहून कराची येथे स्थलांतरित झाले. १९६४ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले होते. लाहोर येथील फॉर्मर ख्रिश्चन महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले होते. २००१ ते २००८ या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.

कारगिल युद्धाचे खलनायक
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी भारतावर कारगिलचे युद्ध लादले होते. कारगिलच्या युद्धाचे षडयंत्र परवेज मुशर्रफ यांनीच रचले होते. मात्र. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा सहभाग नसल्याचा आव त्यांनी आणला होता. आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी भारताची कुरापत काढली होती. या युद्धात भारताच्या ५२७ जवानांना वीरमरण आले होते. “इन द लाइन ऑफ फायर” या आपल्या आत्मचरित्रात मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या खोटारडेपणाची कबुली दिली आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की, “पाकिस्तानी सैन्य युद्धात सहभागी होते, मात्र हे सत्य आम्ही लपवले” या यद्धचे खापर त्यांनी नवाज शरीफ यांच्यावर फोडले होते.

हे सुद्धा वाचा

आयएएस अधिकाऱ्याची कामगिरी, मोठ्या प्रकल्पातही शेतकऱयांचे जपले हीत !

पाकिस्तानकडून आशिया चषक 2023 चे यजमानपद हूकण्याची शक्यता; स्पर्धा UAE मध्ये भरविण्याबाबत विचार

अदानी समूहाच्या साम्राज्याला ग्रहण लावणारा अँडरसन आहे तरी कोण? शॉर्ट सेलर असल्याचा अदानींचा आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी