29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeजागतिकGautam Adani : गौतम अदानी ठरले जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani : गौतम अदानी ठरले जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

भारतीय अरबपतींच्या यादीमध्ये गौतम अदानी यांचे नाव अग्रगण्य आहे. गौतम अदानी यांची संपत्ती ही 137.4 म्हणजेच सुमारे 11 लाख करोड रुपये आहे. ते जगातील तिसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.

भारतीय अरबपतींच्या यादीमध्ये गौतम अदानी (Gautam Adani) यांचे नाव अग्रगण्य आहे. गौतम अदानी यांची संपत्ती ही 137.4 म्हणजेच सुमारे 11 लाख करोड रुपये आहे. ते जगातील तिसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी फ्रांसचे बर्नाड अरनॉल्ट यांना मागे टाकले आहे. ते आशियाई ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स टॉप तीनमध्ये आहेत. आता ते केवळ मस्क‍ आणि बेजोस यांच्या मागे आहेत. एलन मस्क यांच्याकडे 251 बिलियन डॉलरची संपत्ती आहे. बेजोस यांच्याकडे 153 अरब डॉलरची संपत्ती असून, ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

अदानी हे टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय आहेत. तर रिलायंसचे संस्थापक मुकेश अंबानी हे 11 नंबरवर आहेत. मागच्या महिन्यात अदानी चौथे सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. त्यांनी बिल गेटस यांना मागे टाकले. अदानी यांनी 2022 मध्ये 60.9 बिलियन डॉलर गुंतवणूक केली आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये रिलायंसच्या मुकेश अंबानीना मागे टाकले होते. एप्रिल 2021 मध्ये 57 अरब डॉलरची संपत्ती होती. अदानी हे 4 एप्र‍िलला सेंटीबिलियनसर्य क्लबमध्ये शमील झाले होते. 100 बिल‍ियनहून जास्त डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तीला सेंटीबिलियनेयर म्हटले जाते.

2021 -2022 मध्ये अदानी यांची आर्थिक घोडदौड वेगाने सुरू झाली. अदानी ग्रुपच्या सात मोठया नामांकित कंपन्या आहेत. अदानी हे एक अरबपती भारतीय आहेत. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरातमध्ये आहेत. तर त्यांची पत्नी प्रीती अदानी फाउंडेशनचे नेतृत्व करते. गौतम अदानींचा जन्म 24 जून 1962 मध्ये अहमदाबाद मध्ये जैन परिवारात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव शांतिलाल आणि आईचे नाव शांती आहे. त्यांना सात भाऊ-बहीणी आहेत.

हे सुद्धा वाचा

अष्टविनायक दर्शन : सातवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर

Teacher day: महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना मिळणार द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा दबदबा वाढला, मुंबई पोलिसांनी घेतले नमते

त्यांचे शिक्षण अहमदाबादच्या शेठ सीएन विद्यालयात झाले. त्यांनी कॉमर्स शाखेतून शिक्षण घेतले. त्यांनी दुसऱ्याचा वर्षी कॉलेज सोडले. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचा कपडयाचा व्यवसाय होता. तो त्यांनी सांभाळला नाही. त्यांनी डायमंड ब्रोकरेज फर्म पासून आपल्या व्यवसायाला सुरूवात केली. मुंबईमधील जवेरी बाजारात त्यांनी 1978 मध्ये हा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर पॉलीविनाइल क्लोराईड, मुंद्रा पोर्ट कॉन्ट्रैक्ट, एक्सपोटर्स व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी 90 च्या दशकांमध्ये व्यवसायाचा विस्तार केला. गौतम अदानी (Gautam Adani) हे एक यशस्वी उदयोजक आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी