33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeजागतिकGoogle तुमचे Gmail अकाऊंट, फोटोज डिलीट करेल; जर तुम्ही 'हे' केलेले नसेल...

Google तुमचे Gmail अकाऊंट, फोटोज डिलीट करेल; जर तुम्ही ‘हे’ केलेले नसेल तर …

डिसेंबर 2023 पर्यंत गुगलने दिली शेवटची संधी; तात्काळ आपली अकाउंट्स तपासून पाहा, नाहीतर ... ❂✶❂ तुम्हाला तुमचे जीमेल अकाऊंट सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला 'गुगल' अकाउंट्समध्ये जाऊन काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

जीमेल युझर्ससाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर 2023 पासून Google तुमचे Gmail अकाऊंट, फोटोज डिलीट करेल; जर तुम्ही ‘हे’ केलेले नसेल तर … तुम्हाला तुमचे जीमेल अकाऊंट सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला ‘गुगल’ अकाउंट्समध्ये जाऊन काही गोष्टी करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे जीमेल आणि गुगल फोटोज अकाऊंट डिलीट होण्यापासून कसे वाचवू शकता, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या भारतात गुगलचे जीमेल हे सर्वाधिक लोकप्रिय ई-मेल प्रोव्हायडर आहे. ई-मेल म्हणजे जीमेल इतके हे अतूट उदाहरण बनले आहे. 100 पैकी 92 भारतीयांचे वैयक्तिक ई-मेल अकाऊंट हे जीमेलवर असते. तर अनेकांची जीमेलवर एकाहून अनेक अकाउंट्स आहेत. कुणी बॅकअपसाठी, कुणी फोटो स्टोअर करण्यासाठी तर कुणी वेगवेगळ्या कारणांनी मुख्य वापराच्या जीमेल अकाऊंटव्यतिरिक्त इतर अनेक जीमेल अकाऊंट सुरू करतात. यातले अनेक महाभाग तर असे असतात, की वर्षानुवर्षे ते जीमेल अकाऊंट उघडूनही पाहत नाहीत. आजवर हे सारे चालत होते; पण यापुढे हे आजिबात चालणार नाही. याशिवाय, काही झाडाझडतीनंतर ट्विटरच्या धर्तीवर गुगल आपल्या अनेक सेवा पेड करणार आहे.

 

तुमच्याकडे एखादे Gmail अकाऊंट आहे; पण दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्ही ते वापरले नसल्यास Google तुमचे खाते डिलीट करणार आहे. गुगलने निष्क्रिय खात्यांसाठीच्या धोरणात सुधारणा जाहीर केल्या आहेत. त्या युझर्सना कळविण्यात आल्या आहेत. युझर्सना दर 24 महिन्यांतून किमान एकदा त्यांच्या गुगल अकाउंट्समध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे. युझर्सनी त्यांची सर्व जुनी गुगल अकाउंट्स तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ‘गुगल’च्या नियमानुसार, दोन वर्षांपासून न वापरलेल्या अकाउंट्समधील डेटा पूर्णपणे डिलीट केला जाऊ शकतो. तो नियम आता बदलला आहे. ‘गुगल’ने इनअॅक्टीव्ह म्हणजे न वापरलेल्या अकाउंट्ससाठी थेट डेटा डिलीट न करता युझर्सना ही शेवटची मुदत दिली आहे.

गुगलने यासंबंधी जारी निवेदनात म्हटले आहे, की  “डेटा थेट डिलीट होण्याचा धोका कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमधील गुगल खात्यांसाठी निष्क्रियतेचा दोन वर्षांपर्यंतचा कालावधी वाढवत आहोत. गुगल अकाऊंट आणि त्याच्यांशी संबंधित सर्व डेटा जसे की गुगल वर्कप्लेस, जीमेल, डॉक्स, ड्राईव्ह, मीट, कॅलेंडर, यूट्यूब आणि गुगल फोटोज हे जर गेल्या किमान दोन वर्षांपासून वापरले किंवा साइन इन केले नसेल तर, या वर्षाच्या अखेरीस, ते डिलीट केले जाईल. आता त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही.”

हे सुद्धा वाचा :

चॅटजीपीटी एआय चॅटबॉट्समुळे Gmailच्या शेवटाची घटिका समीप; जीमेल निर्माते पॉल बुचेट यांचा महाभयंकर इशारा

पाच ट्रेंडस् जे बदलवून टाकतील आपले ऑनलाईन जीवन

चुकूनही गुगलवर हे सर्च करू नका, अन्यथा जावे लागू शकते तुरुंगात

गुगलचे नवीन धोरण लगेच लागू होणार नाही. या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत वेळ आहे. त्यामुळे जे युझर्स जीमेलवर सक्रिय नाहीत, त्यांना त्यांचे जुने खाते रिटेन करण्यासाठी अद्याप वेळ आहे. आशा युझर्सना त्यांचे पूर्वीचे लॉगिन क्रेडेन्शियल पुनर्संचयित करण्याचा किंवा हटविण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईपर्यंत थांबवण्याचा सल्ला गुगलने दिला आहे. विशेष म्हणजे, गुगलने एकदा डिलीट केलेले जीमेल अकाऊंट किंवा त्यातील डेटा परत मिळवता येत नाहीत.

Google Will Delete Your Gmail Account, Google Will Delete Your Photos, Google Account Delete, Googal Account Data, What to do to save Gmail AC

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी