33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeजागतिकपाकिस्तानी 'ईडी'कडून हायकोर्टातच इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानी ‘ईडी’कडून हायकोर्टातच इम्रान खान यांना अटक

भारतातील 'ईडी'सारखीच असलेल्या पाकिस्तानच्या अंमलबजावणी एजन्सीने इम्रान यांना पाकिस्तानी रेंजर्समार्फत अटक केली आहे. हायकोर्टातून इम्रान खान यांना रेंजर्सनी फरफटत नेले. न्यायालयाच्या आवारातून आशा पद्धतीने राजकीय अटक होण्याची पाकिस्तानच्या अलीकडील इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. पाकिस्तानसाठी आजचा दिवस काळा दिवस मानला जात आहे. अनेक शहरात या अटकेच्या निषेधार्थ हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत. आधीच अशांत असलेला पाकिस्तान गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर दिसत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांना हायकोर्टाच्या आवारातच प्रचंड पोलिस बंदोबस्तात आणि विशेष जवानांच्या पथकाच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आले. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भारतातील ‘ईडी’सारखीच असलेल्या पाकिस्तानच्या अंमलबजावणी एजन्सीने इम्रान यांना पाकिस्तानी रेंजर्समार्फत अटक केली आहे.

हायकोर्टातून इम्रान खान यांना रेंजर्सनी फरफटत नेले. न्यायालयाच्या आवारातून आशा पद्धतीने राजकीय अटक होण्याची पाकिस्तानच्या अलीकडील इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. पाकिस्तानसाठी आजचा दिवस काळा दिवस मानला जात आहे. अनेक शहरात या अटकेच्या निषेधार्थ हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत. आधीच अशांत असलेला पाकिस्तान गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर दिसत आहे.

 
पीटीआय पक्षाने इम्रानच्या अटकेचा व्हिडिओ जारी केला आहे. (सौजन्य : डॉन)

इम्रान खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना मंगळवारी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली. इम्रान खान हे इस्लामाबाद उच्च न्यायालयात त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या अनेक खटल्यांमध्ये जामीन अर्ज दाखल करण्यासाठी हजर झाले होते. त्यावेळी हायकोर्ट आवारातूनच त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी यापूर्वीही इम्रान खान यांना अटक करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) डॉ अकबर नासिर खान यांनी इम्रान खान यांच्या अटकेची पुष्टी केली आहे. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान हे बायोमेट्रिक्ससाठी हायकोर्टाच्या आवारात जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. भारतातील ‘ईडी’सारखीच पाकिस्तानची अंमलबजावणी एजन्सी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) इम्रान यांना अटक केली आहे. त्यांना ताब्यात घेऊन काळ्या रंगाच्या कारमधून हायकोर्ट आवारातून नेले गेले आहे. पीटीआय पक्षाने इम्रानच्या अटकेचा व्हिडिओ जारी केला आहे.

हे सुद्धा वाचा :

इम्रान खानची 49 वर्षीय घटस्फोटित पत्नी रेहम खान तिसर्‍यांदा चढली बोहल्यावर; 14 वर्षे लहान असलेल्या मिर्झा बिलालशी केला निकाह !

फुकटचे बुडबुडे फोडू नका, 56 इंचाची छाती काय असते ते जावेद अख्तरांकडून शिका! ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

पाकिस्तानचे पंतप्रधान उघड्यावर, निवासस्थान दिले भाड्याने

Imran Khan Arrested, Pakistani NAB Action, Islamabad High Court, Pak PM, Al Qadir Trust Case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी