25 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
HomeजागतिकElon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच

Elon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच

मस्क यांनी ट्विटर कंपनीवर ताबा मिळविल्यानंतर ट्विटरवर व्देष परविणारा (हेट कंटेंट) मजकूर वाढत चालला आहे. सायबर-सामाजिक धोक्यांची माहिती देणारी नेटवर्क कॉन्टॅजियन रिसर्च इंस्टीट्यूट ने म्हटले आहे की, ट्विटरवर नकारात्मक शब्दांचा वापर 500 पट वाढला आहे.

उद्योगपती एलन मस्क यांनी मागील आठवड्यात ट्विटर कंपनी खरेदी केल्यानंतर ट्विटरच्या मॅनेजमेंटमध्ये मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत. जाहिरात आणि मॅनेजमेंट प्रमुखांसहित अनेक बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये सध्या मोठे बदल होत आहेत. एकापाठोपाठ एक उच्चपदस्थ अधिकारी कंपनी सोडून जात आहेत. दरम्यान ट्विटरवर व्देष पसरवणारा मजकूर (हेट कंटेंट) वाढत असल्याचा आरोप देखील होत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका अहवालातून दावा केला आहे की, कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना कंपनीच्या भविष्यातील धोरणांबद्दल खुपच कमी माहिती आहे. बुधवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणारी बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एलन मस्क यांची टीम या आठवड्यात जाहिरातदारांशी न्युयॉर्कमध्ये बैठक घेणार आहे.

मस्क यांनी ट्विटर कंपनीवर ताबा मिळविल्यानंतर ट्विटरवर व्देष परविणारा (हेट कंटेंट) मजकूर वाढत चालला आहे. सायबर-सामाजिक धोक्यांची माहिती देणारी नेटवर्क कॉन्टॅजियन रिसर्च इंस्टीट्यूट ने म्हटले आहे की, ट्विटरवर नकारात्मक शब्दांचा वापर 500 पट वाढला आहे. NAACP आणि फ्री प्रेससह 40 हून अधिक संघटनांनी मंगळवारी ट्विटरच्या महत्त्वाच्या 20 जाहिरातदारांना एक खुले पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, जर एलन मस्क ट्विटरवर कंटेंट मॉडरेशन करण्याचा प्रयत्न करत अतील तर त्यांना जाहिरात देणे बंद करावे. तर दुसरीकडे ब्रॅन्ड्सच्या सुरक्षेप्रती ट्विटरच्या वचनबद्धतेमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा :

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणात कोर्टाची ‘तारीख पे तारीख’ सुरूच! संजय राऊतांची कोठडी वाढली

Morbi Bridge Collapse : ‘देवाची करणी’ ! मोरबे पूल प्रकरणात ओरवे कंपनीच्या व्यवस्थापकाचा अजब दावा

Tomato Prices : ‘टोमॅटो’ने शेतकऱ्यांना रडवलं; दर कमालीचे कोसळले

ट्विटर कंपनी एलन मस्क यांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल, मुख्य वित्त अधिकारी नेड सेहगड, आणि कंपनीचे धोरण राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या विजया गड्डे यांना देखील कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर प्रमुख कस्टमर ऑफिसर सारा पर्सनेट यांनी ट्विट करुन मागच्या आठवड्यात आपण राजीनामा दिल्याचे जाहीर केले. सारा यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीचे जाहिरात धोरण काय असेल आणि कंपनी यापढे कोणत्या मार्गाने जाईल याबाबत जाहिरातदारांमध्ये संभ्रम वाढला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी