30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरजागतिक...तर भारतावर हल्ला करू, खालिस्तानी दहशतवाद्याच्या व्हिडीओने खळबळ

…तर भारतावर हल्ला करू, खालिस्तानी दहशतवाद्याच्या व्हिडीओने खळबळ

एका व्हिडीओने भारतात खळबळ उडवली आहे. हा व्हिडीओ आहे खालिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नून याचा. आणि या व्हिडीओतून त्याने थेट भारताला धमकी दिली आहे. भारताने इस्रायल – हमास युद्धात इस्रायला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दहशदवादी पन्नूची धमकी खूप महत्त्वाची आहे. ज्या प्रमाणे हमासने इस्रायलवर हल्ला केला तशीच वेळ भारतावर येऊ शकते, असा इशारा पन्नूने व्हायरल केलेल्या ऑनलाईन व्हिडीओत आहे. गुरपतवंतसिंग पन्नून हा अमेरिकेतील शिख फॉर जस्टिस म्हणजे एस.एफ.जे. संघटनेचा म्होरक्या आहे. दरम्यान, भारत सरकारने पन्नूनच्या धमकीची दखल घेतली असली तरी फारसे महत्त्व दिलेले नाही. दरम्यान, पन्नूच्या व्हिडीओची अमेरिकेनेही दखल घेतलेली आहे.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूनचा हा धमकीचा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापासून धडा घ्यावा, असा सल्ला देतानाच भारतावर सुद्धा इस्त्रायलसारखी वेळ येऊ शकते, अशी थेट धमकी गुरपतवंतसिंगने भारताला दिली आहे. पंजाब ते पॅलेस्टाईनपर्यंत अनेक ठिकाणी ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने जागा बळकावली आहे त्या सगळ्यांना हेच सांगतो आहे की, हिंसाचार हिंसाचाराला जन्म देतो. जर भारताने पंजाबची जागा बळकावणे सुरू ठेवले तर त्यावर भविष्यात नक्कीच प्रतिक्रिया मिळेल आणि त्याला भारत आणि पंतप्रधान मोदी जबाबदार असतील, असेही गुरपतवंतसिंगने म्हटले आहे.

या व्हिडीओत गुरपतवंतसिंग पन्नूनने दावा केला आहे की, एसएफजेचा बॅलेट आणि मतांवर विश्वास आहे. पंजाबला मुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे. आता भारताने निवड करायची आहे की, त्यांना बॅलेट हवे आहे की बुलेट, या शब्दांत गुरपतवंतसिंग पन्नूनने भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर कॅनडात हत्या झालेल्या दहशतवादी हरदीपसिंग निजारच्या हत्येचा शिख फॉर जस्टिस जरूर बदला घेईल, अशी धमकीही त्यांने या व्हिडीओतून दिली आहे.

हे ही वाचा

सुप्रिया सुळे कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? पवारांना ‘तो’ म्हणणारा कोण?

‘झोपलेल्या जयकुमारला जागे करू नका,’ जयकुमार यांचा विरोधकांवर पलटवार, शरद पवारांचा एकेरी उल्लेख

नांदेड रुग्णालयात मृत्युचे तांडव, ८ दिवसांत १०८ मृत्यू

या धमकीच्या व्हिडीओनंतर पन्नूनवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. १४ ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्या आयसीसी वर्ल्डकपचा सामना होणार आहे. त्यापूर्वी पन्नूनने हा धमकीचा व्हिडीओ व्हायरला केला आहे. पन्नून हा कट्टर खालिस्तानी समर्थक असून २०१९ पासून राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अपराधी घोषित केले होते.  तत्पूर्वी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाने पन्नूनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी