27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरजागतिकमायक्रोसॉफ्टसुद्धा १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत

मायक्रोसॉफ्टसुद्धा १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत

आर्थिक मंदी व त्यामुळे सुरु असणारी टाळेबंदी यामुळे मोठ्या प्रसिद्ध टेक कंपनीतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक संकटाचे कारण पुढे करत मायक्रोसॉफ्ट कंपनीनेसुद्धा कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरातील अनेक कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात करण्यास सुरू केली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. अशातच पुन्हा एकदा प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. आर्थिक संकटाचे कारण पुढे करत मायक्रोसॉफ्ट कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक मंदी व त्यामुळे सुरु असणारी टाळेबंदी यामुळे टेक क्षेत्रात कमर्चाऱ्यांची कपात ही अनेक कंपन्यांकडून सुरु राहणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी महामारीनंतर पुढील दोन वर्षे या क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा दिला होता. या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येक टेक कंपन्यांनी सक्षम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मायक्रोसॉफ्टने 1अब्ज डॉलर खर्च वाचवण्याच्या प्रयत्नात जवळपास 10,000 नोकऱ्या किंवा जवळपास 5 टक्के कर्मचारी काढून टाकण्याची योजना आखत असल्याचे जाहीर केले. आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत नोकर कपात सुरू राहण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी एक ओपन ब्लॉग पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यात कंपनीच्या कर्मचार्‍यांना देखील संबोधित केले होते, ज्यात कंपनी असे का करत आहे याची कारणे सांगितली होती.

पोस्टमध्ये, नडेला यांनी भर दिला की हा महत्त्वपूर्ण बदलांचा काळ आहे आणि हे स्पष्ट होते की मायक्रोसॉफ्टने “साथीच्या रोगाच्या काळात ग्राहकांनी त्यांच्या डिजिटल खर्चाला गती दिली, तेव्हा आम्ही आता त्यांना त्यांच्या डिजिटल खर्चाला कमी करून अधिक करण्यासाठी ऑप्टिमाइझ करताना पाहत आहोत.” ते म्हणाले की “प्रत्येक उद्योगातील जागतिक संस्था आता जगातील काही भाग मंदीत असल्याने सावधगिरी बाळगत आहेत.

हे सुद्धा वाचा : नव्या वर्षात देखील जगावर आर्थिक मंदीचे सावट ; IMF प्रमुखांचा इशारा

’या‘ कंपन्यांनी उचलले कामगार कपातीचे पाऊल

VIDEO : अमॅझॉन मधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची संक्रांत

सीईओ नडेला यांचे कर्मचाऱ्यांना ईमेल
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी याबद्दल कर्मचाऱ्यांना ईमेल केला आहे. यात त्यांनी सध्यस्थिती आणि भविष्यातील अंदाज यावर भाष्य केले आहे. हा काळ प्रत्येकासाठी खूप आव्हानात्मक आहे. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शकपणे करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. काही कर्मचाऱ्यांची कपात नक्कीच केली जात आहे. मात्र कंपनीचे महत्वाचे प्रकल्प जिथे चालू आहेत तिथे नोकरभरती सुरु राहील असे सत्या नडेला यांनी या ईमेलमध्ये म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण सन्मान मिळावा व आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात याची काळजी घेतली जाणार आहे अशी माहिती नडेला यांनी दिली. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांसाठी आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट आधीच ChatGPT, Dall-E च्या मागे असलेल्या OpenAI मध्ये आणखी १० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची चर्चा करत आहे. खरे तर Azure OpenAI सेवांचा भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट त्याच्या Azure ग्राहकांना ChatGPT ऑफर करण्यास सुरुवात करणार आहे असे नडेला यांनी नमूद केले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी