30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeजागतिकNASA : अरे बापरे ! नासा लवकरच मानवी पुतळे चंद्रावर पाठवणार

NASA : अरे बापरे ! नासा लवकरच मानवी पुतळे चंद्रावर पाठवणार

अंतराळातील लहरींचा मानवी शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे नासाने पुतळे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नासाचे हे आर्टेमिस-1 मिशन आहे. 'मॅनिकिंस' अशी ओळख असलेल्या पतुळयांचा वैज्ञानिक रहस्‍य शोधण्यासाठी वापर केला जातो.

तब्बल 65 वर्षांनंतर नासा 3 मानवी पुतळे चंद्रावर पाठवत आहे. या पुतळयांना हायटेक मॅनिकिंस असे म्हणतात. या पूर्वी 3 नोव्हेंबर 1957 ला ‘लाइका’ नावाच्या कुत्रीला पहिल्यांदा सोविऐत संघाने चंद्रावर पाठवले होते. नासाने माणसांच्या जागेवर पुतळे पाठवण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण अंतराळातील लहरींचा मानवी शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे नासाने पुतळे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नासाचे हे आर्टेमिस-1 मिशन आहे. ‘मॅनिकिंस’ अशी ओळख असलेल्या पतुळयांचा वैज्ञानिक रहस्‍य शोधण्यासाठी वापर केला जातो.

NASA : अरे बापरे ! नासा लवकरच मानवी पुतळे चंद्रावर पाठवणार

या पुतळयांना नावे देखील देण्यात आली आहेत. यातील महिला पुतळयांचे नाव हेल्गा, जोहर असून, पुरुष पुतळयाचे नाव मूनिकिन कँपोस आहे. त्यांना फॅटम्स देखील म्हणतात. हे पतुळे जर्मनीच्या ऍरोस्पेस सेंटरमध्ये बनले आहेत. नासाने हे पुतळे माणसाप्रमाणे बनवले आहेत. त्यांचे शरीर माणसाच्या त्त्वचेसारखे असून, प्लास्टिक पासुन बनवले आहे. यामध्ये माणसांप्रमाणे हाडे, फुफुस यासारखे अवयव देखील आहेत.

हेल्गा आणि जोहर यांसारख्या पुतळयांचा वापर कॅन्सरच्या उपचारावेळी रेडिएशन मोजण्यासाठी देखील करतात. हे पुतळे महिलांच्या शरीराप्रमाणे आहेत. चंद्रावर गेलेल्या मानवावर कोणता परिणाम होईल याचा शोध घेतला जाणार आहे. मूनिक‍िन कॅपोस रॉकेटच्या कमांडर सीटवर राहिल अशी याची रचना केली आहे. या संशोधनामध्ये हजारो सेंसर्स रेकॉर्ड होतील.
पुरूष पुतळयावर सेंसर्स लावण्यात आला आहे.‍ त्यामुळे चंद्रावरील वातावरणाचा मानवी शरिराव काय पर‍िणाम होणार आहे. हे कळण्यास मदत होईल असे वैज्ञानिकांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : रामराजे नाईक निंबाळकरांना शेतकऱ्यांनी सुनावले खडे बोल !

ऐकावे ते नवलच, नापास केले म्हणून विद्यार्थ्यांनी मास्तरांनाच धुतले

BMC : मनपाच्या मुख्य लिपीक परिक्षेमध्ये मोठा घोटाळा, नापास उमेदवारांना केले पास

पुतळे अंतराळातून पुन्हा परत येणार आहेत. लॉन्च केल्यापासून होणारे प्रत्येक रेडीएशन समजणार आहे. हेल्गा आणि जोहर यांना ड्रेस कोड देखील देण्यात आला आहे.जोहरला रेडिएशनपासून वाचण्यासाठी जॅकेट घातले आहे. या जॅकेटला एस्ट्रोरेड असे म्हणतात. तर दुसरा पुतळा बिना जॅकेटचा आहे. तो एस्ट्रॉरेड पॉल‍िथीनपासुन तयार करण्यात आला आहे. या संशोधनानंतर अंतरिक्षात जाणाऱ्या माणसांच्या शरीरावर काय फरक पडेल हे समजेल. हे जॅकेट इस्त्रायलमधील एका स्टार्ट-अप कंपनीने बनवले आहे.

जर्मनी एयरोस्पेस सेंटरच्या मात्रोश्का एस्ट्रोरेड रेडिएशनचे प्रमुख वैज्ञानिक थॉमस बर्गर यांनी सांगितले की, महिला वैज्ञानिकांची अंतरिक्षात जाण्याची संख्या वाढत आहे. त्यासाठी हे पुतळे बनवण्यात आले. नासा आर्टेमिस-1मध्ये 30 टक्के इंजिनीयर महिला आहेत. 20 फेब्रुवारी 1947 ला एका माशीला अंतराळात पाठवण्यात आले होते. त्यानंतर उंदीर, माकड, मांजर, मेंढी, कुत्रा यांना अंतराळात पाठवण्यात आले होते. त्यानंतर 21 जुलै 1969 मध्ये नील ऑर्मस्ट्राँग नील ऑलड्रीन यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. आर्टेमिस-1 42 दिवस अंतराळात निरीक्षण करणार आहे. त्यानंतर 2024 मध्ये नासा पुन्हा चंद्रावर माणूस पाठवणार आहे. त्यानंतर 2025 मध्ये नासा आर्टेमिस-3 मून मिशन राबवणार आहे. त्यावेळेस अंतराळ यात्री चंद्रावर उतरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी