34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeजागतिकपाकिस्तानची माणूसकीला काळीमा फासणारी कृती; भुकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीला जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या...

पाकिस्तानची माणूसकीला काळीमा फासणारी कृती; भुकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीला जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानाला परवानगी नाकारली

तुर्की (Turkey), सिरीयामध्ये (Syria) झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये (earthquake) आतापर्यंत ५ हजार लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहे. अशा संकटकाळात जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक देशांनी भुकंपग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय वायूसेना देखील तुर्कीतील भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धावली असताना पाकिस्तानने मात्र अत्यंत असंवेदनशीलपणा दाखवत भारतीय हवाई दलाच्या C-17 विमालाना तुर्कीमध्ये जाण्यासाठी हवाई हद्दीची परवानगी नाकारल्यामुळे हवाई दलाच्या विमानाला मदत कार्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीला वळसा घालून जावे लागले. (Pakistan denied airspace to Indian Air Force plane carrying aid to earthquake-hit Turkey)

तुर्की, सीरियामध्ये सोमवारी जोरदार भुकंपाचे धक्के बसले, पहाटे साखर झोपेत असतानाच अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि मृत्यू पावले. अशा संकटकाळात जगभरातून मदतीच्या भावनेने देश पुढे येत आहेत. भारताने देखील या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत भुकंप्रग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 हे विमान तुर्कीला मदत घेऊन जात असताना पाकिस्तानने अशा प्रसंगात भारतीय हवाई दलाच्या विमानाला पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यास परवानगी नाकारली. पाकिस्तानची ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असून पाकिस्तानच्या या कृतीची सर्वत्र निंदा होत आहे.

हे सुद्धा वाचा

तुर्की, सिरीयातील शक्तीशाली भूकंपात आतापर्यंत २३०० लोकांचा मृत्यू

तुर्कस्तान, सीरिया हादरले : भूकंपात ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, ३४ इमारती जमीनदोस्त

नाना पटोलेंचे कारस्थान कॉंग्रेसच्या मुळावर, बाळासाहेब थोरातांचा राजीनामा !

 

दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने मदतीची घोषणा केल्यानंतर भारतीय हवाई दलाची विमाने मदत घेऊन तुर्कीकडे पाठविण्यात आली. एनडीआरएफचे पथक भुकंपग्रस्तांसाठी मदतीच्या साहित्याची दुसरी खेप घेऊन आज ( दि. ७) रोजी तुर्कीकडे रवाना झाले आहे. तर पहिली खेप मंगळवारी तुर्कीत पोहचली असून यामध्ये ५० हून अधिक एनडीआरएफ, बचाव पथकाचे कर्मचारी आहेत. तसेच श्वान पथक, ड्रिलिंग मशिन, मदतीचे साहित्य, औषधोपचाराचे साहित्य आणि अत्यावश्यक साहित्यासह मदतीसाठी पहिली खेप घेऊन भारतीय हवाई दलाचे IAF C17 हे विमान तुर्कीतील अडाना शहरात पोहचले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी