30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeजागतिकपाकिस्तानसमोर दहशतवादाचे आव्हान; सीमाभागातील हजारो लोक रस्त्यावर

पाकिस्तानसमोर दहशतवादाचे आव्हान; सीमाभागातील हजारो लोक रस्त्यावर

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर (Pakistan) आता दहशतवादाचे संकट  (Terrorism) उभे राहिले आहे. पाकिस्तानात दहशतवादी घटनादिवसेंदिवस वाढत असून अफगानिस्तानला लागून असलेल्या सीमाभागातील दहशतवादी घटना पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाकिस्तानात बंदी असलेली तहरिक-ई-तालिबान पाकिस्तान (TTP) ही संघटना यापाठीमागे असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान- अफगानिस्तान सीमाभागातील उत्तर-पश्चिमप्रदेशातील आदिवासीबहूल जिल्ह्यांमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी घटनांविरोधात हजारो आदिवासी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. या आदिवासी समुहांनी स्थानिक प्रदेशात तातडीने शांतता प्रस्थापित व्हावी अशी मागणी केली आहे. दहशतवादी घटनांविरोधात शुक्रवारी (दि. ६) वाना शहरात हजारो लोकांनी रस्त्यावर येवून आंदोलन केल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्रांनी दिले आहे. (Pakistan Facing Challenge of Terrorism situation in the border areas is fragile, thousands of people are on the streets)

पाकिस्तानातील खैबर पख्तून आणि बलूचीस्तान या प्रांतात दहशतवादी घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमागे तहरिक-ई-तालिबान पाकिस्तान या बंदी असलेल्या संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे. या प्रांतातील अनेक शहरांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये दवसेंदिवस वाढ होत असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

सीमाभागातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असल्याचे देखील बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे लोक तेथे आपले उद्योगधंदे करण्यास धजावत नसल्याचे देखील सांगितले जात आहे. जर येथील परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणली नाही तर आदिवासी तरुणांमधील असंतोष वाढत जाईल. आदिवासी भागातील रहिवाशांचे जनजीवन सुरक्षीत ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे देखील स्थानिक नागरिक बोलत आहेत.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल तर स्पष्ट सांगा: आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांना दिल्लीचा धत्तुरा; विधानसभेतील एकनाथ शिंदे यांच्या “मन की बात”ला अनुराग ठाकूर यांनी लाथाडले!

हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखे; संजय राऊतांची टीका

तहरिक-ई-तालिबान पाकिस्ताने पाकिस्तानमध्ये यापूर्वी देखील अनेकवेळा दहशतवादी हल्ले केले आहेत. सन २००९ मध्ये सैन्यदलाच्या मुख्यालयावर, तसेच सैन्याच्या छावण्यांवर देखील हल्ले केले आहेत. २००८ साली इस्लामाबादमधील मॅरिएट हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देखील त्यांचा हात असल्याचे सांगण्यात आले होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी