29 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरजागतिकRishi Sunak: सुधा मूर्तीं म्हणाल्या काँग्रॅच्युलेशन्स ऋषी!

Rishi Sunak: सुधा मूर्तीं म्हणाल्या काँग्रॅच्युलेशन्स ऋषी!

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाली आहे. त्यामुळे देशातून तसेच जगभरातून देखील त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच ऋषी सुनक यांच्या सासू तसेच भारतीय लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी देखील खास शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाली आहे. त्यामुळे देशातून तसेच जगभरातून देखील त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच ऋषी सुनक यांच्या सासू तसेच भारतीय लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी देखील खास शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे. सुधा मूर्ती यांनी ट्विट करून ‘कॉँग्रेच्युलेशन्स ऋषी’ असे म्हणत ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ऋषी सुनक यांच्या पत्नी आणि सुधा मुर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती तसेच सुनक यांच्या दोन्ही मुली कृष्णा व अक्षता यांचा फोटो पोस्ट केला आहे.

 

सोमवारी 200 खासदारांनी पाठिंबा जाहीर केल्याने सुनक यांची कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या संसदीय नेतेपदी निवड झाली. पेनी मॉरडाँट यांनी अखेरच्या क्षणी आपले नाव मागे घेतले. त्यामुळे सुनक यांचे पंतप्रधानपदाचे स्थान पक्के झाले. ऋषी सुनक हे ब्रिटनचे ५७ वे पंतप्रधान असणार आहेत. आज (मंगळवार) त्यांना ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांनी शपथ दिली. बकिंगहॅम पॅलेस येथे पंतप्रधानपदाचाशपथग्रहण पार पडला. हा समारंभ झाल्यानंतर सुनक यांनी ब्रिटनच्या महारांजांपुढे ब्रिटनशी एकनिष्ठतेची शपथ घेतली. समारंभ पार पडल्यानंतर ब्रिटनचे महाराज चार्ल्स तृतिय यांच्यासोबत गुप्त बैठक झाली. ऋषि सुनक हे ब्रिटनचे एका वर्षात तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.

हे देखील वाचा :
Mumbai Rape Case : 14 वर्षीय तरुणीवर भावाकडून वारंवार बला’त्कार! गर्भवती झाल्यानंतर गैरप्रकार उघड
Eknath Shinde : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
diwali wishes: समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्या घरी रामदास आठवलेंची खास भेट; वाचा काय म्हणाल्या क्रांती रेडकर
शपथग्रहण समारंभ पार पडल्यानंतर पंतप्रधान सुनक म्हणाले, आज आम्ही ज्या संकटांचा सामना करत आहोत, त्या संकटांचा सामना करण्याचा प्रयत्न मी करेन, पुढची पीढीवर असे कोणतेच कर्ज ठेवणार नाही की, पुढची पिढी म्हणेल की आम्ही अकार्यक्षम होतो. ते पुढे म्हणाले की मी देशाला ‘कथनी’ नव्हे तर ‘करणी’ने एकजूट करण्याचा प्रयत्न करेन. जनतेला उद्देशून ते म्हणाले मी तुमच्यासाठी दिवसरात्र कष्ट करेन, आपण एकजूटीने काम केल्यास अविश्वसनीय वाटतील अशा गोष्टी आपण साध्य करू शकतो.
– ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत महिला अक्षता सुनक
अक्षता मूर्ती या इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या आहे. अक्षता यांचा जन्म कर्नाटकमधील हुबळी येथे झाला होता. अक्षता आणि ऋषी सुनक यांची स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असताना ओळख झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये त्यांचा बंगळूरु येथे विवाह झाला. अक्षता मूर्ती यांची गणना ब्रिटनच्या सर्वाधिक श्रीमंत महिलांमध्ये केली जाते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!