26 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरजागतिकतुर्कस्तान, सीरिया हादरले : भूकंपात ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, ३४ इमारती...

तुर्कस्तान, सीरिया हादरले : भूकंपात ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, ३४ इमारती जमीनदोस्त

दक्षिण तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी भूकंपाच्या प्रचंड धक्क्यात ५०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ७.८ रिस्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने तुर्कस्तान आणि सिरियातील नागरिकांची दाणादाण उडवली. सोमवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.१७ वाजता या परिसरात भूकंपाचे हादरे बसले. त्यामुळे कित्येक इमारतींची पडझड झाली. कडाक्याच्या थंडीत जीव वाचविण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Turkey, Syria shake: earthquake kills more than 50 civilians, collapses buildings) या धक्क्याने एका क्षणात सर्वच उद्ध्वस्त झाले. सर्वत्र विखुरलेल्या धातूच्या आणि काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली बचाव पथकातील कर्मचारी आणि नागरिक आप्तस्वकियांचा शोध घेत आहेत. सायप्रस, लेबेनॉन आणि सीरियामध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले.

Turkey, Syria shake: earthquake kills more than 50 civilians, collapses buildings

या भूकंपाने पडझड झालेल्या आणि कलंडलेल्या धोकादायक स्थितीतील इमारतींमधील नागरिकांना जीव वाचविण्यासाठी रस्त्यावरील लोकांचा आक्रोश सुरु होता. या भूकंपाचे केंद्रस्थान सीरियाच्या सीमेपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या गाझियानतेप शहराच्या उत्तरेला होते. हा भूकंप इतका प्रचंड होता की त्याचे धक्के इजिप्तची राजधानी कैरोलादेखील जाणवले. सीरियामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून नागरी युद्ध सुरु आहे. त्यामुळे येथील कित्येक नागरिक या ठिकाणाहून स्थलांतरित झाले आहेत. जीव वाचविण्यासाठी देशातून पलायन केलेल्या या निर्वासितांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. सीरियाच्या उत्तरेला तुर्कस्तानला लागून असलेल्या सीमेनजीकच्या शहरांमध्ये जगभरातील सर्वाधिक सीरियन स्थलांतरित नागरिकांची वस्ती आहे.

Turkey, Syria shake: earthquake kills more than 50 civilians, collapses buildings
या धक्क्याने एका क्षणात सर्वच उद्ध्वस्त झाले. सर्वत्र विखुरलेल्या धातूच्या आणि काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली बचाव पथकातील कर्मचारी आणि नागरिक आप्तस्वकियांचा शोध घेत आहेत.

आत्मेद या शहरात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर कित्येक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, अशी माहिती मुतीब कदर या डॉक्टरने ‘असोसिएट प्रेस’ला फोनवरून दिली. कादिरने सांगतिले की, “या भूकंपात हजारोंच्या संख्येने नागरिकांचा जीव गेला आहे. मृतांची संख्या प्रचंड आहे. आम्ही प्रचंड तणावाखाली आहोत.” तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यीब इरोदगान यांनी ट्विटरवर म्हंटले आहे की, “घटनास्थळी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. शोध आणि बचाव पथकाचा जवानांना त्वरित घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. आम्ही आशा करतो की आम्ही शक्य तितक्या लवकर आणि कमीत कमी नुकसान सहन करत या आपत्तीतून बाहेर पडू.”


हे सुद्धा वाचा

कोविड साथीमागे बिल गेट्स? अखेर आरोपांवर बिलभाईंनी प्रथमच सोडले मौन; जाणून घ्या काय म्हणाले गेट्स …

मराठ्यांना ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आदित्य ठाकरेंचा सोमवारपासून उत्तर महाराष्ट्रात शिवसंवाद

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी