33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeजागतिकजगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत?

जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत?

जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. याचीच खबरदारी घेत भारतानेही सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त जगातील पहिली नाकावाटे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस भारतात लाँच झाली आहे. (World’s first covid nasal vaccine launched in India)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राजधानी दिल्लीत या लसीचे प्रक्षेपण केले. कोव्हॅक्सिनचे उत्पादन करणाऱ्या हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने (Bharat Biotech) वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, ही लस नाकावाटे शरीरात पोहोचवली जाते. इनकोव्हॅक (iNCOVACC) असे या लसीचे नाव आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल अशी माहिती त्यांनी ट्विटर हॅंडलवरुन दिली.

सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. लसीसाठी 800 रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या डिसेंबरमध्ये ही लस 325 रुपयांना सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. लसीचे आरक्षण कोविन पोर्टलवरून केले जाईल. दरम्यान, 6 सप्टेंबर 2022 मध्ये डीजीसीआयने 18 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना आपत्कालीन वापरासाठी इनकोव्हॅक या कोरोना प्रतिबंध लसीच्या वापरास मान्यता दिली होती. यापूर्वी, डीजीसीआयकडून इंट्रानेसल हेटरोलॉजस बूस्टर लसीच्या वापरासाठी भारत बायोटेकने अधिकृत परवानगीसाठी अर्ज केला होता. साधारणत: प्रत्येक प्रौढ व्यक्तीला या लसीचे चार थेंब नाकावाटे दिले जातील.

हे सुद्धा वाचा : CORONA: आता जवळच्या मेडिकलमध्येही लसीकरण होणार सहज शक्य!

कोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

VIDEO : चीनमधील कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डसारख्या लस घेऊन झालेल्यांना ती बूस्टर डोस म्हणून दिली जाईल. यासह ती प्राथमिक लस म्हणूनही वापरता येईल. या लसीचे ४ थेंबही पुरेसे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील, अशी माहिती भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी दिली.

शिवाय, भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ‘इनकोव्हॅक’ ही नाकावाटे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोवॅक्सिन ही पहिली कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लसही भारत बायोटेकनेच तयार केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी