28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeजागतिकWWE स्टार सारा लीच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा

WWE स्टार सारा लीच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा

माजी वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट (WWE) स्टार रेसलर सारा ली हीच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. सारा ली ने प्रमाणाबाहेर ड्रग्ज आणि मद्य सेवन केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे नशेच्या धुंदीत सारा लीने आत्महत्या केली. सारा लीने अवघ्या 30 व्या वर्षी मृत्यूला कवटाळले. सारा ली 5 ऑक्टोबर रोजी सॅन अँटोनियो येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली.

सारा लीच्या मृत्यूची माहिती तीची आई टेरी यांनी दिली होती. त्यांनी फेसबूक पोस्ट लिहून तिच्या निधनाची माहिती दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, अत्यंत दु:खद अंतकरणाने सांगावे लागत आहे की, आमची सारा आता आम्हाला सोडून गेली आहे. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो. आमच्यासाठी साराचा मृत्यू एक धक्का असून हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. मृत्यू पूर्वी साराने जीममधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली होती. साराने तीचा फोटो पोस्ट करत तिला इन्फेक्शन झाल्याचे तिने सांगितले होते, तसेच इन्फेक्शनमधून ती बरी होत असून खुप दिवसांनंतर दोन दिवस जीम केल्यानतर खुपच चांगले वाटत असल्याचे तिने म्हटले होते.

साराच्या मृत्यूनंतर महिनाभराने त्यांच्या कुटुंबियांच्या जवळच्या एका व्यक्तीने ज्या रात्री साराचा मृत्यू झाला, त्या रात्री तीने अतीप्रमाणात मद्यसोवन केल्याचा दावा केला होता. तसेच तीचा मृत्यू म्हणजे एक दुर्देवी घटना असल्याचे देखील त्याने म्हटले होते. साराच्या मृत्यूनंतर वर्षभराने वैद्यकिय परिक्षकाने दावा केला आहे की, ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्यावेळी तिने ड्रग्जच्या गोळ्या आणि अतीप्रमाणात मद्यसेवन केले होते. या दोन्हींचा अत्यंत वाईट परिनाम झाल्याने तीचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

एनसीबीच्या कारवाईत 6 कोटीच ड्रग्स जप्त; पुण्याच्या मेडिकल स्टोरमध्ये मिळताहेत बंदी घातलेली औषध

अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार प्रकरणी वृध्दाला 10 वर्ष शिक्षा

कोल्हापूर येथील संपत्तीच्या वादातून तरुणांची मुंबईत हत्या.मामे भावाने केली हत्या.

सारा लीने मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहील्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारा लीच्या डोक्यावर तसेच शरिरावर जखमांच्या खुना देखील दिसून आल्या. तपास अधिकाऱ्यांना शंका होती की, सारा ली नशेच्या धुंदीत पडल्यामुळे ती जखमी झाली असावी. बेक्सर काउंटी मेडिकल एक्जामिनर कार्यालयाच्या एका प्रवक्त्याने एनबीसी न्यूजला सांगितले की, सारा लीचा मृत्यू घातक अशा मिश्रित औषधांच्या विषबाधेमुळे झाला. तिच्या शरीरात डॉक्सिलामाइन, अॅम्फेटामाइन आणि अल्कोहोल आढळून आले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी