राजकीयमहाराष्ट्र

‘अमरावतीमधील दगंल प्रकरणाचा मास्टरमाईंड अभय माथने नसून यशोमती ठाकूर’

अचलपूरमध्ये झेंडा काढण्याच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून अचलपूर परतवाडा व कांडली परिसरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर अध्यक्ष अभय माथने यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

टीम लय भारी : 

मुंबई : अचलपूरमध्ये झेंडा काढण्याच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून अचलपूर परतवाडा व कांडली परिसरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर अध्यक्ष अभय माथने यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा अचलपूर प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. (Yashomati Thakur is the mastermind of the Amravati riots)

'अमरावतीमधील दगंल प्रकरणाचा मास्टरमाईंड अभय माथने नसून यशोमती ठाकूर'

१२नोव्हेंबर दिवशी अमरावतीत घडलेल्या मुस्लिम मोर्चामध्ये त्यांचाच हात होता, असे देखील अनिल बोंडे यांनी सांगितले आहे. पोलिसांनी याप्रकरणी २३ जणांना अटक (Arrested) केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

झेंडा लावण्यावरून वाद टाळण्यासाठी अचलपूर शहरातील सहाही पुरातन प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी पोलिसांना दिले. तर दोन गटात झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मोहल्ला कमिटी तयार करण्यात येईल. ज्या ठिकाणी प्रवेशद्वारावर झेंडा लावण्यावरून वाद झाला त्या ठिकाणी आता पुढे झेंडे लावता येणार नाही, असा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला. यावेळी बच्चू कडू यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्यासाठी आवाहन दिले आहे.


हे सुद्धा वाचा : 

सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला : खासदार सुप्रिया सुळे

सत्ताधीशांनी मुंबईला मृत्यूचा सापळा केलेय : आशिष शेलारांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल

महाराष्ट्राचे सुपुत्र, लेफ्टनंट जनरल मनोज पांडेची, भारतीय लष्कर प्रमुख पदी नियुक्ती

VIDEO : सदाभाऊंनी करुन दिली पवारांच्या ‘त्या’ एका वक्तव्याची आठवण

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close