27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयहो !राजकारणात काहीही घडू शकतं

हो !राजकारणात काहीही घडू शकतं

टीम लय भारी

मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी केंद्राची इच्छा आहे. तसेच भाजपचे
राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची व्यक्तीगत इच्छा आहे. जे.पी. नड्डा यांनी सांगितल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील का? या बाबत सगळयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. फडणवीसांना 2024 च्या निवडणुकीच्या तयारी साठी प्रदेश अध्यक्ष पद हवे होते. जे. पी. नड्डा यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची गळ घातली.

फडणवीस हे भाजपचे विश्वासून नेते आहेत. मात्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेली व्यक्ती उपमुख्यमंत्री पद कसे स्विकारेल? असा पेचप्रसंग निर्माण झाला. शिवाय आपण एकनाथ शिंदेना राजकारणात बाहेरुन पाठिंबा देणार असल्याचे फडवीस आपल्या भाषणात बोलले होते. मी स्वतः मंत्रीमंडळात नसणार असे त्यांनी सांगितले होते. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला.

मुख्यमंत्री पदाची खूर्ची गेल्यापासून ते खूपच अस्वस्थ झाले होते. त्यांची सातत्याने आग पाखड सुरु होती. मग आता ते उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची स्विकारतील का? स्विकारली तर तो नाईलाज असेल. कारण मोदी शहांपुढे ते काहीच बोलू शकणार नाहीत. हे सगळं अनपेक्षीत आहे.

हे सुध्दा वाचा:

मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असतांना चेहरा मात्र चोरा सारखा

‘लय भारी’चे भाकीत ठरले खरे, एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सात दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती बातमी

एकनाथ शिंदेंनी 11 वी नंतर ‘डायरेक्ट’ 15 वीची दिली परीक्षा

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी